राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत पाकिस्तानातील लोकांच्या मनात सर्वाधिक द्वेष उफाळून आला आहे. पाकिस्तानातील लोकांना जेव्हा प्राणप्रतिष्ठेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी याबाबत तिरस्कार व्यक्त केला, इतकेच नाही तर तेथील नागरिकांनी पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर हल्ला करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे वृत्त समोर आले आहे. (pakistani-public-reaction )
पाकिस्तानी सरकारनेसुद्धा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला याआधीच विरोध दर्शवला होता, मात्र आता राम मंदिराच्या अभिषेकानंतर पाकिस्तानातील लोक मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत एकमेकांशी चर्चा करत आहेत. आम्ही भारतात काही करू शकत नसलो, तरी पाकिस्तानातील मंदिरे पाडू शकतो, असे पाकिस्तानी लोकांचे म्हणणे आहे. सोमवारी राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर पाकिस्तानातील काही युट्युबर्सनी लोकांशी संवाद साधला. यामध्ये पाकिस्तानी लोकांचा भारतीयांप्रती असलेला द्वेष स्पष्टपणे दिसत होता.
“…Pakistani Hindus shouldn’t mind if we break their couple of temples…”
– Common Pakistani Islamist pic.twitter.com/pi9ig8fyJe
— Pakistan Untold (@pakistan_untold) January 23, 2024
पाकिस्तानी यूट्यूबर निमरा अहमदने लोकांशी संवाद साधला. त्यावेळी एका व्यक्तीने सांगितले की, त्यांनी आमच्यासोबत जे काही केले आहे, तेच आम्ही त्यांच्यासोबत करू. ते काय करणार, असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही पाकिस्तानातील मंदिरेही पाडू. ते पुढे म्हणाले की, अयोध्येत मंदिराच्या बांधकामाविरोधात आम्ही पाकिस्तानमध्ये आंदोलन करणार आहोत. इस्लामचा बालेकिल्ला असलेला सौदी विरोध का करत नाही, असे विचारले असता, यावर त्या व्यक्तीने सांगितले की, ते कोणत्याही विषयावर नेहमीच मौन बाळगतात.
पाकिस्तानच्या लोकांमध्ये भारत आणि हिंदूंबद्दल किती चीड आहे, हे एका व्यक्तीच्या वक्तव्यातूनही दिसून आले. ते म्हणाले, ‘आम्ही भारतात जाऊन मंदिरे नष्ट करू शकणार नाही. त्यामुळे पाकिस्तानातील एक-दोन मंदिरे पाडली पाहिजेत. यावर, शेवटी नुकसान पाकिस्तानातील हिंदूंचेच आहे, असा प्रश्न विचारला असता त्यावर आश्चर्यकारक उत्तर मिळाले. या व्यक्तीने सांगितले की, पाकिस्तानमध्ये फार कमी हिंदू राहतात. एक-दोन मंदिरे पाडली तर काय फरक पडतो?
राम मंदिरामुळे पाकिस्तानींचा द्वेष वाढला…
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे पाकिस्तानातील लोकांच्या मनात भारताविषयी असलेल्या द्वेषात वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सोमवारी राम मंदिरांविरोधात ‘मंदिरे भारताच्या लोकशाहीवरील डाग असल्याचे म्हटले आहे. बाबरीची इमारत डिसेंबर १९९२ मध्ये पाडण्यात आली. यानंतर पाकिस्तानात हिंदूंच्या विरोधात वादळ उठले होते. पाकिस्तानमध्ये 30 हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. लाहोरमध्ये बुलडोझर वापरून एक मंदिर पाडण्यात आले. यापैकी कोणत्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात आली, याची कोणतीही माहिती पाकिस्तानने आजपर्यंत दिलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community