Indian Territory: पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत घुसला आणि…

237
Indian Territory: पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत घुसला आणि...
Indian Territory: पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत घुसला आणि...

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला (Indian Territory) लागून असलेल्या अमृतसरमध्ये शुक्रवारी (29 नोव्हेंबर) एक पाकिस्तानी नागरिक भारतीय हद्दीत घुसल्याची घटना घडली होती. झडतीदरम्यान बीएसएफच्या पथकाने या तरुणाच्या ताब्यातून 866 रुपये किमतीचे पाकिस्तानी चलन आणि पाकिस्तानी (Pakistan) राष्ट्रीय ओळखपत्राची प्रत जप्त केली. त्याच्याकडे सापडलेल्या राष्ट्रीय ओळखपत्रावरून तो मूळचा पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा- Cheetah Corridor: तीन राज्यांना मिळून बनणार देशातील सर्वात मोठा चित्ता कॉरिडॉर!

या व्यक्तीचा हेतू जाणून घेण्यासाठी बीएसएफने त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत या व्यक्तीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेची माहिती नसल्यामुळे तो चुकून भारतीय सीमेत घुसला. बीएसएफला तपासादरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, या व्यक्तीबाबत पाक रेंजर्सकडून बीएसएफकडे (BSF) विनंती करण्यात आली. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला परत सोपवले. (Indian Territory)

हेही वाचा- Mumbai Local Mega Block : रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या …

बीएसएफच्या या कामाचे पाकिस्तान रेंजर्सकडून कौतुक करण्यात आले. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक काल चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसला होता. बीएसएफच्या जवानांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार तपास सुरू करण्यात आला. बीएसएफच्या प्राथमिक तपासात ती व्यक्ती चुकून आणि कोणत्याही हेतूशिवाय सीमा ओलांडली होती. त्यानंतर पाकिस्तान रेंजर्सशी (Pakistan Rangers) संपर्क साधण्यात आला. नियमानुसार व्यक्तीची ओळख पटली. त्यानंतर बीएसएफ अधिकाऱ्यांनी त्याला परत देण्याचा निर्णय घेतला. (Indian Territory)

हेही वाचा- Eknath Shinde : अजित पवारांनी बिघडवले शिंदेंचे गणित

बीएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सीमांच्या सुरक्षेसाठी ते पूर्णपणे वचनबद्ध आहे, परंतु त्याच वेळी मानवतावादी बाबींमध्ये संवेदनशीलता दाखवण्याचीही जबाबदारी आहे. या घटनेने पुन्हा एकदा दिसून आले की बीएसएफ सीमेवरील कडक सुरक्षेसोबतच मानवतावादी मूल्याचे पालन करते. (Indian Territory)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.