Pakistan चे सैन्य हादरले; सामूहिक राजीनामे देण्याचे सत्र सुरु

बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मागील आठवड्यात चार हल्ले केले आहेत. शेवटच्या हल्ल्यात तर ९० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा या संघटनेने केला आहे.

155

पाकिस्तानात (Pakistan) बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानला पळता भुई थोडी करून ठेवले आहे. मागील आठवड्यात एका मागोमाग एक आत्मघातकी हल्ले करून पाकिस्तानी सैन्याचे शिरकांड सुरु केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे (Pakistan) सैन्य पुरते घाबरले आहे. त्यांनी सैन्याची नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला असून सैन्य सामूहिक राजीनामे देऊ लागले आहे.

(हेही वाचा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची औरंगजेबच्या कबरी संदर्भात स्पष्ट भूमिका; म्हणाले, उदात्तीकरण चालणार नाही )

बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मागील आठवड्यात चार हल्ले केले आहेत. शेवटच्या हल्ल्यात तर ९० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. यामुळे सैनिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा परिणाम पाकिस्तानी (Pakistan) सैन्याच्या मनोधैर्यावर होत असून, या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये वाढत असलेली असुरक्षितता, सातत्याने सैनिकांचे जात असलेले बळी आणि पाकिस्तानची ढासळत असलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तानी (Pakistan) सैन्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानमध्ये आपला जीव धोक्यात घालण्याऐवजी सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि संयक्त अरब अमिरातीमध्ये काम करण्याचा पर्याय निवडत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.