परमवीर चक्र सन्मानित जवानांना ‘परमवीर शौर्य, प्रणाम’

युद्धात शत्रू समोर दाखवलेल्या शौर्याबद्दल हे परमवीर चक्र भारतीय सैन्य दलातील जवानाला दिले जाते या परमवीर चक्र मिळालेल्या २१ जणांची महती सांगण्याचा कार्यक्रम म्हणजे परमवीर - शौर्य, प्रणाम!

349

भारतीय सैन्यातील तिन्ही दलांमधील जे २१ परमवीर चक्र सन्मानित जवान आहेत, ज्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी शौर्य गाजवले, त्या जवानांची महती सांगणारा दृकश्राव्य माध्यमातून सांगीतिक सोहळा रविवार, २३ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे संपन्न झाला.

राष्ट्राभिमान जागृत करणाऱ्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परुळकर, ईशान्य भारतात ५० वर्षे सामाजिक कार्य करत असलेले दिलीप परांजपे, वीरमाता मीनल मोदी, कारगिल युद्धातील जवान हवालदार सर्जेराव किटे, कर्नल एन.एन. सुरी, संगीत ज्ञानानंद – संगीता आमलाडी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

मी स्वतः भारतीय संरक्षण दलाचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करतो. त्यासाठी मी वेगवेगळे उपक्रम राबवतो. शौर्य दिनदर्शिका प्रसिद्ध करत असतो. परमवीर चक्र सन्मानित जवानांवर ‘.. जरा याद करो कुर्बानी’ हे पुस्तकाची निर्मिती केली आहे. तसेच token of love एक कृतज्ञता म्हणून जवानांना दिवाळी फराळ पाठवत असतो. भारतीय सैन्य दलाची जाणीव प्रत्येकाच्या मनात असावी म्हणून आपण समाजात वेगवेगळे उपक्रम राबवत असतो.  कारण आज ते तिथे आहेत म्हणून आपण उद्याचा दिवस पाहू शकतो, सण – उत्सव साजरे करू शकतो, त्यांना एक प्रकारे मानवंदना आहे. त्यांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेणे त्याच्याविषयी आदर व्यक्त करणे, असा यामागील उद्देश आहे.
– कुणाल सुतावणे, विविसु डेहरा – नमस्ते शौर्य फाऊंडेशन.

काय वैशिष्ट्ये होती या कार्यक्रमाची? 

१९४७ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा भौगोलिक आलेख खूपच बदलला. कारण पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत करण्यासाठी लगेच युद्ध पुकारले. भारतीय सेनेचे त्यात खूपच नुकसान झाले. मग १९६२ मध्ये चीनने आक्रमण, १९६५, १९७२, १९९९ मध्ये पाकिस्तानने पुन्हा पुन्हा आक्रमण केले. पण भारतीय सैन्याने कधीही पाठ दाखवली नाही. भारतीय सैन्याचा गौरव करण्यासाठी परमवीर चक्र हे सर्वोच्च पदक आहे. १९५० मध्ये भारत सरकारने परमवीर चक्र या पदकाची निर्मिती केली. युद्धात शत्रू समोर दाखवलेल्या शौर्याबद्दल हे परमवीर चक्र भारतीय सैन्य दलातील जवानाला दिले जाते या परमवीर चक्र मिळालेल्या २१ जणांची महती सांगण्याचा कार्यक्रम म्हणजे परमवीर – शौर्य, प्रणाम!

(हेही वाचा ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू पुन्हा जमले जंतरमंतरवर)

स्वातंत्र्य भारताने कोणती आणि किती युद्ध केली? भारतीय सैन्य दलातील कोणकोणते दल आहेत? युद्धात त्यांची कोणती भूमिका असते? परमवीर चक्र काय असते, त्याची निर्मिती कोणी केली? कोणाला दिले जाते परमवीर चक्र?, कोण आहेत परमवीर चक्र विजेते?? या सर्व  प्रश्नांची उत्तरे ‘परमवीर -शौर्य, प्रणाम’ या कार्यक्रमातून उपस्थितांना मिळाली. ज्यांनी भारतमातेच्या रक्षणासाठी शौर्य गाजवले, त्या जवानांची महती सांगणारा हा कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमातून सांगीतिक रूपात होता. या कार्यक्रमाचा हा दुसरा प्रयोग होता. त्याआधी डोंबिवलीत हा प्रयोग 15 जानेवारी 2023 (भारतीय सेनेचे अमृत महोत्सवी वर्ष) रोजी भारतीय सेना दिवसाचे औचित्य साधून झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.