Parliament Security: संसदेची सुरक्षा आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे, ३ हजारांहून अधिक जवान सज्ज; कारण काय ?

243
Waqf Board JPC : वक्फ दुरुस्ती विधेयकासाठीच्या संसदीय समितीत असणार 'हे' 31 सदस्य

केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा सोमवारपासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान (CRPF) १४०० हून अधिक जवान संसदेच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आले होते, मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुरक्षा भंगाच्या घटनेमुळे आता संसदेच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफकडून ३३०० जवान तैनात केले आहेत. (Parliament Security)

सकाळी ६ वाजल्यापासून संसदेच्या दोन्ही इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफच्या जवानांकडे असेल. संसदेवर २००१ साली दहशतवादी हल्ला झाल्यानंतर गेल्या वर्षी १३ डिसेंबरला २ तरुणांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून धुरकांड्यांसह उडी मारल्यामुळे संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. यानंतर केंद्र सरकारने या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सीआरपीएफच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार, केंद्र सरकारने संसदेच्या जुन्या आणि नवीन इमारतीची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सुरक्षा केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (CRPF)होती. या दलाच्या संसद ड्युटी दलाची (पीजीडी) सेवा आता समाप्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ओडिशातील निवडणूक रोमांचक वळणावर, बीजेडीपुढे अस्तित्त्वाचे संकट)

पोलिसांचे सुरक्षा जवानही संसदेच्या सुरक्षा रचनेतून वगळले
संसदेच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’कडून ३३०० जवान तैनात केले जाणार आहेत. संसदेच्या सुरक्षेचे ३ स्तर असतात. यामध्ये दिल्ली पोलीस, लोकसभा सचिवालयाचे सुरक्षा जवानही असतात. नव्या सुरक्षा रचनेनुसार, संसदेच्या सर्व प्रवेशद्वारांवर ‘सीआयएसएफ’चे जवान तैनात असतील. याशिवाय अग्निशमन दल, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, संचारविभागही सीआयएसएफच्या नियंत्रणात येणार आहे. यामुळे दिल्ली पोलिसांचे सुरक्षा जवानही संसदेच्या सुरक्षा रचनेतून वगळले आहेत.

नवा गणवेश
मागील १० दिवसांपासून ‘सीआयएसएफ’च्या जवानांना सुरक्षेच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जात होते. या सर्वांना आता नवा गणवेश देण्यात आला असून फिकट निळ्या रंगाचे शर्ट आणि खाकी पॅंट घालून हे सुरक्षा रक्षक संसदेच्या परिसरात सेवा बजावणार आहेत. ‘पीजीडी’ पथक आता व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी असलेल्या ‘सीआरपीएफ’च्या बटालियनमध्ये विलीन केले जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.