Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये समुद्रकिनारी विमान क्रॅश; Video Viral

96
Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये समुद्रकिनारी विमान क्रॅश; Video Viral
Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये समुद्रकिनारी विमान क्रॅश; Video Viral

कझाकिस्तानच्या (Kazakhstan Plane Crash) अक्ताऊमध्ये समुद्रकिनारी विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. समुद्रकिनारी विमान क्रॅश झाल्यानंतर स्फोट झाला असून या विमानातून 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, पुढे काय झालं हे अद्याप कळू शकलं नाही. (Kazakhstan Plane Crash)

अजरबैजान एरलाईनचं (Azerbaijan Airlines) हे विमान असून या विमानातून 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. कझाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालायने याबाबत माहिती देताना सांगितले की, विमान दुर्घटनेच्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाची पोहोचली आहे. सध्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत काही जण सुदैवाने बचावले आहेत. (Kazakhstan Plane Crash)

हेही वाचा-Kalyan Minor Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

रुसी न्यूज एजन्सीनुसार, अजरबैजान एयरलाईन्सच्या ह्या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण भरले होते. ग्रोज्नीमध्ये धुके पडल्याने या विमानाने प्रवासी मार्ग बदलला होता. दरम्यान, अद्याप अजरबैजान एयरलाइंसने या दुर्घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. (Kazakhstan Plane Crash)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.