78th independence day : देशात समान नागरी कायदा लागू होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

328
78th independence day : देशात समान नागरी कायदा लागू होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
78th independence day : देशात समान नागरी कायदा लागू होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (78th independence day) केलं आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्याच्या परिसरात जमलेल्या जनतेवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं.

“राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे गरजेचे “
पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाच्या राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे गरजेचे आहे. देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधी अनेकवेळा समान नागरी कायद्यावर चर्चा केलेली आहे. अनेकवेळा याबाबत आदेश दिला आहे. ज्या नागरी कायद्याला घेऊन आपण जगत आहोत, तो एका प्रकारे सांप्रदायिक कायदा आहे. हा भेदभाव करणारा कायदा आहे. आज आपण संविधानाचे 75 वर्षे साजरे करत आहोत. संविधान निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे. या गंभीर विषयावर चर्चा व्हायला हवी.”

“… अशा कायद्यांना आधुनिक समाजात कोणतेही स्थान नाही”
“प्रत्येकाने आपापले विचार मांडावेत. जे कायदे धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करतात, जे कायदे उच्च-नीचतेचं कारण बनतात, अशा कायद्यांना आधुनिक समाजात कोणतेही स्थान नाही. म्हणूनच एक सेक्यूलर सिव्हील कोड (Uniform Civil Law) असायला हवा, अशी देशाची मागणी आहे. आपण कम्यूनल सिव्हील कोडमध्ये 75 वर्षे घालवली आहेत. आता आपल्याला सेक्यूलर सिव्हील कोड स्वीकारणे गरजेचे आहे. देशात धर्माच्या आधारावर जो भेदभाव केला जातोय, सामान्य नागरिकांना जो दुरावा जाणवतो, त्यापासून आपल्याला यामुळे मुक्ती मिळेल.” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.