पंतप्रधान मोदींनी निभावला राजधर्म; लेफ्टनंट जनरल हुडांच्या बहिणीला दिले आश्वासन

145

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैन्य दलात कार्यरत जवानांप्रती किती संवेदनशील असतात, याचा प्रत्येय पुन्हा एकदा आला. निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांच्या बहिणीने आरोग्यासंबंधी एक मदत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटद्वारे मागितली. ते ट्विट निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा  यांनी रि-ट्विट करत पंतप्रधानांना टॅग केले. यानंतर काही वेळातच पीएमओ कार्यालयातून त्यांना संपर्क करून पंतप्रधान मोदी यांनी स्वत: त्यांना तातडीने मदत पुरवण्याचे आश्वासन दिले.

निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांची बहीण सुषमा हुडा सध्या कर्करोगाचा सामना करत आहेत. त्यांना स्तनाचा कर्करोग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी अमेरिकेतील जीवरक्षक औषधांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. मात्र त्या औषधांना भारतात अद्याप परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत त्या औषधांना परवानगी देण्याची मागणी केली. ज्यामुळे आपल्यासारख्या अनेक महिलांचेही प्राण वाचतील, असे सुषमा हुडा म्हणाल्या.

https://twitter.com/SushmaHooda/status/1472142441062928385?s=20

(हेही वाचा गुलाबराव पाटलांची घसरली जीभ, म्हणाले, ‘रस्ते हेमा मालिनीच्या गालाप्रमाणे…’)

लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांनी केले रि-ट्विट आणि…

सुषमा हुडा यांचे ट्विट निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांनी रि-ट्विट करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले. त्यानंतर काही क्षणातच पंतप्रधान कार्यालयातून त्यांना संपर्क करण्यात आला आणि सुषमा हुडा यांच्या मागणीचा तातडीने विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

कोण आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा?

निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा हे धडाडीचे सेना अधिकारी होते. जेव्हा पाकिस्तानने भारतात पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला केला. त्यात ३० जवान हुतात्मा झाले. याचा बदला भारताने पाकिस्तानात घुसून उरी येथील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्थ केली. या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.