सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील जनतेने जो उठाव केला आहे, त्यामुळे पाकिस्तान सरकार, पोलीस आणि लष्कर यांच्यात नाकीनऊ आली आहे. अशा वेळी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पाक सरकारने मोठा खुलासा केला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भूभाग नाही, असे पाक सरकारनेच स्वतः म्हटले आहे.
पीओकेविषयी (POK) पाकिस्तान सरकारच्या खुलाशाने एकच खळबळ उडाली आहे. पीओकेमध्ये सध्या पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणबाजी सुरु आहे. मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि नागरिकांमध्ये धुमश्चक्री उडालेली आहे. पीओकेतील कवी आणि पत्रकार अहमद फरहद शाह हे दोन आठवड्यांपासून गायब आहेत. याप्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सुनावणीवेळी ‘पीओके पाकिस्तानचा भाग नाही’, असा कबुलीनामा सरकारी पक्षाने न्यायालयात केला.
(हेही वाचा Indi Alliance च्या बैठकीला कोणते नेते उपस्थित आणि कोणते अनुपस्थित?)
न्यायालयाने सुनावले
पीओकेत (POK) सध्या पाकिस्तानविरोधी राग आळवण्यात आलेला आहे. येथील नामधारी सरकार आणि पाकिस्तानविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. त्यातच पीओकेतील लोकप्रिय कवी अहमद फरहाद हे गेल्या दोन आठवड्यापासून गायब आहेत. पोओकेतील आंदोलकांच्या मते, पाकिस्तान पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबले आहे. तर काहींच्या मते, ते भूमिगत झाले असतील. याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकिलांनी, ‘अहमद फरहाद यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना पाकिस्तान सरकार अटक करु शकत नाही, कारण पीओके हा आपला भूभाग नाही तर दुसऱ्या देशाचा भाग आहे’, असा युक्तीवाद केला. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर उच्च न्यायालय म्हणाले, पीओके जर दुसऱ्या देशाचा भाग आहे, तर मग तिथे पाकिस्तान रेंजर्स काय करत आहेत.
कोण आहेत कवी अहमद फरहाद
पीओकेत सध्या पाकिस्तानबाबत रोष आहे. कवी अहमद फरहाद हे विद्रोही शायर म्हणून लोकप्रिय आहेत. पाकिस्तानी लष्कर, पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या घरातून त्यांचे अपहरण करण्यात आले.
Join Our WhatsApp Community