पंतप्रधानांच्या सभेसाठी ड्युटी लागल्याने राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील खिंवसर ठाण्याचे पोलीस कर्मचारी गाडीमधून एकत्र निघाले होते. त्यावेळी या गाडीची धडक ट्रकला बसल्याने पोलीस जवानांच्या गाडीला अपघात (Rajasthan Accident) झाला. या अपघातात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ३ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नागौरनंतर चुरू जिल्ह्यात गाडीने प्रवेश केल्यानंतर अपघात घडला. चुरूतल्या तारानगर येथे रविवारी, सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हे पोलीस जवान निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.
मागच्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. कितीही प्रयत्न केले तरी अपघात थांबत नाहीत. आजच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचा – World Cup 2023 Final : भारताविरुद्ध कांगारूंचे ‘हे ७ शिलेदार’ ठरू शकतात भारी)