संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज (१२ ऑक्टो.) पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये लष्कराच्या जवानांसोबत विजयादशमीचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या सैनिकांसोबत शस्त्रपूजन केले. राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम केला. त्यांनी दसऱ्याचा आनंद सैनिकांसोबत शेअर केला, त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला. देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सैनिकांच्या धैर्याचे आणि योगदानाचे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
भारत में विजयादशमी के अवसर पर शस्त्र पूजन की बड़ी पुरानी परंपरा रही है। आज सुकना, दार्जिलिंग में 33 कोर हेडक्वार्टरस में की शस्त्र पूजा। pic.twitter.com/f67IJFyjPz
— Rajnath Singh (@rajnathsingh) October 12, 2024
मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, “तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. भारत हा एकमेव देश आहे जिथे धर्मग्रंथ आणि शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. लोखंड आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तूंची पूजा करणे ही चूक आहे असे वाटते.” परंतु प्रत्यक्षात, ते आपल्या विशाल सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे ज्यामध्ये आपण कोणत्याही वस्तूचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करतो.” असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
‘हा मानवतेचा विजय आहे’
यावेळी ते म्हणाले की, “विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामाने मिळवलेला विजय हा केवळ त्यांचा नव्हता, तर तो मानवतेचा विजय होता. विद्वान असूनही रावण हे वाईटाचे प्रतीक होते. प्रभू रामाचे रावणाशी वैयक्तिक वैर नव्हते. त्याने रावणाचा वध केला कारण ते मानवतेसाठी गरजेचे होते. आम्ही यापूर्वी कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. आमचे कोणाशीही वैर नाही. जेव्हा कोणत्याही देशाने आपल्या अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा अनादर केला तेव्हाच आम्ही युद्ध लढलो.” असं मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. (Rajnath Singh)