भारतीय संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डीआरडीओला आयआयटीची साथ मिळणार आहे. डीआरडीओचा (DRDO – डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन)चे समन्वय केंद्रे देशातील सहा आयआयटीमध्ये उघडण्यात येणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याला मंजुरी दिली आहे. DRDO ने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
#DRDOUpdates | Hon’ble Raksha Mantri has approved setting up of 06 new DRDO Industry Academia-Centre of Excellence (DIA-CoE) at IITs (Kanpur, Kharagpur, Roorkee, BHU, Jodhpur & Hyderabad).@DefenceMinIndia @SpokespersonMoD pic.twitter.com/kIPQ7cCmcn
— DRDO (@DRDO_India) September 15, 2022
कुशल कर्मचारी तयार करण्याचा डीआरडीओचा प्रयत्न
या समन्वय केंद्रामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या समन्वय केंद्रामुळे डीआरडीओलाही फायदा होणार आहे. समन्वय केंद्रामुळे डीआरडीओला अनेक कुशल असेल कर्मचारी मिळू शकतात. उद्योग आणि शैक्षणिक यामध्ये समन्वय साधून कुशल कर्मचारी तयार करण्याचा प्रयत्न डीआरडीओचा आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओला सहा आयआयटीमध्ये समन्वय केंद्र उभारण्याची मंजुरी दिली आहे. यामध्ये हैदराबाद, जोधपूर, कानपूर, खरगपूर, रुरखी आणि भू या सहा आयआयटी केंद्राचा समावेश आहे. येथील विद्यार्थ्यांना डीआरडीओमध्ये आपले टॅलेंट सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. सहा आयआयटीमधील समन्वय केंद्रे संरक्षण आणि सुरक्षेसाठी विशिष्ट आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या जलद विकासासाठी संशोधन करतील, असे ट्वीट डीआरडीओने केले आहे.
(हेही वाचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न)
Join Our WhatsApp Community