हिंदी महासागरात होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारत आणि ब्रिटन एकत्र येणारा आहेत. संरक्षण मंत्री सध्या तीन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून या दौऱ्यादरम्यान संरक्षणाबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली.
2025 मध्ये ब्रिटिश नौदल हिंदी महासागरात तैनात केले जाईल. दोन्ही देशांमध्ये लष्करी सरावही होणार आहे. ब्रिटीश नौसेनेतील कॅरियर स्ट्राईक ग्रुप 2025 पर्यंत हिंदी महासागरात तैनात केला जाईल. ब्रिटीश नौदलाचा लिटोरल रिस्पॉन्स ग्रुप (LRG)देखील हिंदी महासागरात तैनात केला जाईल. लिटोरल रिस्पॉन्स ग्रुप आणि कॅरियर स्ट्राइक ग्रुप येथे भारतीय नौदलासह गस्त घालतील आणि संयुक्त प्रशिक्षण घेतील. हिंदी महासागर क्षेत्रात चीन आपल्या कारवाया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला आळा घालण्यासाठी भारत आणि ब्रिटन सातत्याने एकत्र काम करत आहेत.
(हेही वाचा – Cold Weather Update : राज्याला हुडहुडी भरणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट )
लिटोरल रिस्पॉन्स ग्रुप म्हणजे ?
काही वर्षांपूर्वी ब्रिटीश नौदलाने लिटोरल रिस्पॉन्स ग्रुप (एल. आर. जी.) तयार केला रॉयल नेव्हीचा हा एक कृती गट आहे, ज्यामध्ये किमान २ एंफिबियस वॉरफेयर शिप या युद्धनौकांचा समावेश असून रॉयल मरीनची एक कंपनी तसेच सहाय्यक घटक आहेत. यू. के. चा कॅरियर स्ट्राइक ग्रुप हा नौदलाचा वाहक युद्ध गट आहे. येथे विमानवाहू जहाजे आहेत, जी सुमारे 40 विमाने वाहून नेऊ शकतात याशिवाय पाणबुड्या, फ्लीट टॅंकर हाही याचा एक भाग असेल. याबाबत ‘यावर्षी ब्रिटन उच्च संरक्षण क्षमता असलेला लिटोरल प्रतिसाद गट हिंदी महासागरात पाठवेल’, असे ब्रिटिश संरक्षण सचिव ग्रँट शॅप्स यांनी जाहीर केले आहे.
सागरी व्यापार मार्गांचे संरक्षण
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ब्रिटनचे संरक्षण सचिव यांच्यात झालेल्या बैठकीत 2030 पूर्वी भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांच्या सैन्याने अधिक मोठे आणि जटिल युद्ध सराव करावेत, असा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांचा उद्देश समुद्रातील व्यापारी मार्गांचे संरक्षण करणे हा आहे. त्यामुळे ब्रिटन आणि भारत या देशांच्या सैन्यांमध्ये युद्ध कवायती, माहितीची देवाणघेवाण तसेच प्रशिक्षकांच्या देवाणघेवाणीच्या योजनांबाबतही चर्चा झाली. दोन्ही देश अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, विशेष शाळा प्रशिक्षकांकडे माहितीची देवाणघेवाण करतील असा निर्णय घेण्यात आला. ब्रिटन आणि भारत एकत्र येऊन इलेक्ट्रिक प्रोपल्शिन सिस्टिमवरही भविष्यात काम करतील, या मु्द्द्यांबाबत बैठकीत चर्चा झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community