Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी केले भारताचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण

Rajnath Singh : जनरल रावत हे देशाच्या लष्करी परंपरेचे खरे प्रतीक होते, जेथे सैनिकाचे जन्मस्थान कोणतेही असले, तरी तो देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित राहतो, असे राजनाथ सिंह म्हणाले.

361
Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी केले भारताचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण
Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी केले भारताचे पहिले CDS बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या उपस्थितीत डेहराडून मधील टोन्स ब्रिज स्कूल येथे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, दिवंगत जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. जनरल रावत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. जनरल रावत हे एक वीर सैनिक आणि चांगला माणूस म्हणून कायम स्मरणात राहतील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असे संरक्षण मंत्री (Rajnath Singh) म्हणाले.

(हेही वाचा – Mumbai Coastal Road चे इस्त्राईलच्या मंत्र्यांकडून कौतुक, म्हणाल्या…!)

जनरल रावत देशाच्या लष्करी परंपरेचे प्रतीक

जनरल रावत हे देशाच्या लष्करी परंपरेचे खरे प्रतीक होते, जेथे सैनिकाचे जन्मस्थान कोणतेही असले, तरी तो देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित राहतो, असेही ते म्हणाले.

देशाचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांची नियुक्ती करण्यात आली, जी देशाच्या लष्करी इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या सुधारणांपैकी एक आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले.

सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान

‘सैनिकांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे’ हे सरकारचे कर्तव्य असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आपण सन्मान करत आहोत,” त्यांनी अधोरेखित केले. सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करण्याबरोबरच, सरकारने शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक (National War Memorial) उभारले आहे, यावर त्यांनी भर दिला.

जनरल रावत यांच्या पुतळ्याची स्थापना शाळेच्या आवारात करण्याच्या कल्पनेची प्रशंसा करून, संरक्षण मंत्री म्हणाले की, सशस्त्र दलाच्या शौर्य गाथा मुलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि समर्पणाची भावना जागृत करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.