Agnipath Recruitment: अल्पावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडून घोषणा

सैन्य दलातील भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, मंगळवारी ‘अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली असून यादरम्यान तरुणांना अल्प कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी तिन्ही लष्कर प्रमुखांसह पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, भारतीय सैन्याला जगातील सर्वोत्तम सैन्य बनवण्याच्या दिशेने आज संसदीय सुरक्षा समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांत संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. लष्कराला जगातील सर्वोत्तम सेना बनवण्यासाठी अग्निपथ योजना आणली जात आहे.

(हेही वाचा – राष्ट्रीय सुरक्षा भक्कम करण्यासाठी नागरी-लष्करी समन्वय आवश्यक: राजनाथ सिंह)

भारतीय तरुणांना ‘अग्नीवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी

या योजनेची माहिती देताना राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सशस्त्र दल हे इतके तरूण बनवायचा प्रयत्न आहे, जितकी भारतीय लोकसंख्या व्यापक आहे. ‘अग्निपथ’ योजनेमुळे रोजगार वाढणार आहे. ते म्हणाले की, ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय तरुणांना ‘अग्नीवीर’ म्हणून सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी दिली जाईल. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि आपल्या तरुणांना लष्करी सेवेची संधी देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. अग्निवीरच्या सेवेदरम्यान आत्मसात केलेले कौशल्य आणि अनुभव त्यांना विविध क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यास मदत करेल. अग्निवीरांसाठी चांगले वेतन पॅकेज असेल. सेवा निधी पॅकेज आणि 4 वर्षांच्या सेवेनंतर उदारमतवादी ‘मृत्यू आणि अपंगत्व पॅकेज’ देखील प्रदान करण्यात आले आहे.

काय आहे अग्निपथ योजना

या योजनेमुळे देशातील तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. आता याचे वय 32 वर्षे ठेवले आहे, जे भविष्यात 26 इतके असणार आहे. या योजनेंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अभ्यास केल्यानंतर ही योजना आणली जात आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल आणि चांगला पगारही मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here