अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी अधिसूचना २०जून रोजी जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील दिलेला आहे. उमेदवारांना ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in या लिंकवर जावे लागेल. चार वर्षानंतर निवडलेल्या अग्निवीराला पुढील १५ वर्षासाठी नियुक्त करण्यात येईल.
भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
लष्कारात अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्या मिळणार आहेत. अग्निवीरांना कोणताही महागाई भत्ता किंवा लष्करी सेवा वेतन मिळणार नाही. अग्निवीरांची नोंदणी प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असून पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून होणार आहेत. पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/AV/ वर करता येणार आहे. २४ जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांच्या दुसऱ्या तुकडीचे २३ फेब्रुवारी २०२३ च्या सुमारास प्रशिक्षण सुरू होईल. जवळपास ४० हजार जवनांच्या निवडीसाठी देशभरात एकूण ८३ भरती मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)
- अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ता
- दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ता
- तिसऱ्या वर्षी ३६ हजार ५०० रुपये पगार आणि भत्ता
- चौथ्या वर्षी ४० हजार रूपये पगार आणि भत्ता
- चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र मिळेल.
- दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षानंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.