प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा प्रत्यक्ष राजपथावर घ्या अनुभव! असे बुक करा ऑनलाईन तिकीट

यंदा आपला देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या सोहळ्याचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते. दरवर्षी लाखो लोक हा सोहळा पाहण्यासाठी राजपथावर जमतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपतींसह सामान्य आणि विशेष नागरिक सुद्धा सहभागी होतात. इतर राष्ट्रांमधील काही प्रमुख नागरिकांसुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रित केले जाते.

( हेही वाचा : National Girl Child Day : मुलीच्या भविष्याची चिंता आहे? ‘या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा सर्वाधिक फायदा)

राजपथावरील या सोहळ्याचे सर्वच प्रसारमाध्यमांवर सुद्धा थेट प्रक्षेपण केले जाते. यंदा इजिप्तचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तुम्हालाही या सोहळ्याला उपस्थित रहायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ६ जानेवारीपासून तिकीट खरेदीला सुरूवात झाली आहे. ९ जानेवारीपासून लोक तिकीट खिडकीवर वैयक्तिरित्याही तिकीटे खरेदी करत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या aamantran.mod.gov.in या वेबपोर्टलनरून तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या परेडची ऑनलाईन तिकिटे खरेदी करू शकता.

कसे बुक कराल तिकीट?

  • भारत सरकारने लोकांसाठी aamantran.mod.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. यावर तुम्ही लॉग इन करून तिकीट बुक करू शकता.
  • नोंदणी केल्यावर तुम्हाला OTP येईल. OTP समाविष्ट केल्यावर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला साइन अप करावे लागेल. OTP टाकल्यावर तुम्हाला ज्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे तो कार्यक्रम निवडावा.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक फक्त १० तिकीटे बुक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या तिकीटांवर क्यूआर कोड असेल या कोड स्कॅन करून तुम्हाला सुरक्षा कर्मचारी परेडच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देईल.
  • सेना भवन गेट क्रमांक २, शास्त्री भवन गेट क्रमांक ३, जंतरमंतर आणि गेट क्रमांक १ प्रगती मेन गेट येथून तुम्ही ऑफलाईन तिकीटे खरेदी करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here