प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला (Republic Day Parade 2024) अरुणाचल प्रदेश, हरियाणा, मणिपूर, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, लडाख, तामिळनाडू, गुजरात, मेघालय, झारखंड, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये, केंद्रशासित प्रदेश, ९ मंत्रालये आणि विभागातील २५ देखावे, सहभागी होतील. या दिवशी फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या ५१ विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये २९ लढाऊ विमाने, ७ वाहतूक विमाने, ९ हेलिकॉप्टर आणि एका हेरिटेज विमानाचा समावेश असेल. ही वाहने ६ वेगवेगळ्या तळांवरून चालवले जातील.
गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विमान वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्र (CSIR),निवडणूक आयोग आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) दृश्यमान असतील. चांद्रयान-3 आणि श्रीराम मंदिर हे इस्रोच्या देखाव्यातील सर्वात प्रमुख आकर्षण असेल. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचे यशस्वी लँडिंग आणि चांद्रयान-३ चा लँडिंग पॉइंट ‘शिवशक्ती पॉइंट’ देखील या देखाव्यात साकारला जाणार आहे.
(हेही वाचा – Muslim : मीरा रोडप्रमाणेच मुंबईतील परळ, सांताक्रूझमध्येही धर्मांध मुसलमानांचा दंगल घडवण्याचा होता कट)
याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या देखाव्यात प्रभु श्रीरामांचे अयोध्येतील राम मंदिराचे देखावा हे मुख्य आकर्षण असणार आहे. मेरठ रॅपिड रेल आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा समावेश या देखाव्यात करण्यात आला आहे, कारण उत्तर प्रदेश सरकार पुढील पिढीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी राज्यात एक प्लांट विकसित करत आहे.
९५ सैनिकांच्या मार्चिंग तुकडीचा सहभाग
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी परेडमध्ये फ्रेंच लष्कराच्या ९५ सैनिकांची मार्चिंग तुकडी, ३३ सैनिकांचा बँड आणि राफेल जेट आणि फ्रेंच हवाई दलाचे मल्टीरोल टँकर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट यांचा समावेश असेल. शनिवारी या सर्वांनी परेडची तालीम केली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन परेडमध्ये सहभागी होत आहेत. भारतीय लष्कराने १४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्येही भाग घेतला होता. ज्याचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर सुमिता यादव यांनी केले. बॅस्टिल डे परेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महिला शक्ती थिमनिमित्त अनेक महिलांचा सहभाग…
७५व्या प्रजासत्ताक दिनाची थीम महिला शक्ती आहे. म्हणूनच अनेक महिलांचा सहभाग असलेली विविध पथके यामध्ये सहभागी होणार आहेत. बँड, ट्राय सर्विस इत्यादी काही संघ यामध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. भारतीय सेनेच्या कॅप्टन शरण्य राव यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी सेवेतील तुकडीचा यावेळी महिला शक्ती थिममध्ये सहभाग असेल. भारतीय सेनेच्या कॅप्टन शरण्य यांनी सांगितले की, मी एक सुपरन्युमररी ऑफिसर आहे, आणि तिरंगी सेवेच्या तुकडीचे नेतृत्व करीन. ही अभिमानाची बाब आहे, कारण इतिहासात प्रथमच तिरंगी सेवेची तुकडी कूच करणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच, सीमा सुरक्षा दल (BSF), CISFच्या सर्व महिला मार्चिंग आणि ब्रास बँडदेखील सहभागी होत आहेत.
– भारतीय हवाई दलाच्या १४४ सदस्यांच्या मार्चिंग तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकूर करणार आहेत. स्क्वॉड्रन लीडर सुमिता यादव, स्क्वॉड्रन लीडर प्रतिमा अहलुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनंट कीर्ती रोहिल हेदेखील या पथकात असतील.
– फ्लायपास्टमध्ये २९ लढाऊ विमानांसह ५६ लष्करी विमानांचा समावेश असेल, त्यापैकी काही महिला पायलट चालवतील. फ्लायपास्टमध्ये ६ फायटर पायलटसह १५ महिला वैमानिक सहभागी होणार आहेत. ते राफेल, सुखोई-३० आणि मिग-२९ उडवतील.
– दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील एअरमन ट्रेनिंग स्कूल बेलगावी येथून उत्तीर्ण झालेल्या अग्निवीरवायू (महिला) देखील या परेडमध्ये सहभागी होतील. अग्निवीरांच्या ट्राय सर्व्हिस मार्चिंग तुकडीत १४४ महिलांचा समावेश असेल, ज्यांचे सरासरी वय २० वर्षे आहे.
विशेष मोबिलिटी वाहने परेडमध्ये सहभागी
– ऑल टेरेन व्हेईकल आणि स्पेशालिस्ट मोबिलिटी व्हेईकलचे आकस्मिक कमांडर मेजर तुफान सिंग चौहान यांनी तालमीदरम्यान सांगितले की हे वाहन वाळवंट, डोंगराळ आणि बर्फाळ भागात सैनिकांच्या वाहतुकीसाठी वापरले जाऊ शकते.
– याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे विमानाने नेले जाऊ शकते. त्याचे सस्पेन्शन हे त्याचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ते ६०-डिग्री एलिव्हेशन आणि ४५-डिग्री डिप्रेशनमध्ये काम करण्यास सक्षम होते.
प्रजासत्ताक दिनापर्यंत दिल्लीत दररोज २ तास उड्डाण बंदी
दिल्लीत २६ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी १०.२० ते दुपारी १२.४५ या वेळेत एकही विमान दिल्ली विमानतळावर उतरणार नाही. प्रजासत्ताक दिनाची तयारी आणि कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध १९ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत लागू असतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community