पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या; Jammu Kashmir मधील दहशतवादी हल्ल्यानंतर PM Modi यांचे आदेश

पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारताची दहशतवादविरोधी क्षमता पूर्णपणे तैनात करण्याचे आवाहन केले. तसेच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी सुरक्षा दल तैनात करण्याबाबत आणि दहशतवादविरोधी कारवायांबाबतही चर्चा केली.

215
पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या; Jammu Kashmir मधील दहशतवादी हल्ल्यानंतर PM Modi यांचे आदेश
पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या; Jammu Kashmir मधील दहशतवादी हल्ल्यानंतर PM Modi यांचे आदेश

गेल्या चार दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ठिकाणी हल्ले केले आहेत. त्यात ९ यात्रेकरू आणि १ सीआरपीएफ जवान ठार झाला आहे. सात सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जण जखमी झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवार, १३ जून रोजी जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha), राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) आणि इतर अधिकारीही सहभागी होते. या वेळी पंतप्रधानांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली.

(हेही वाचा – POCSO Case : B. S. Yediyurappa यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी)

या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारताची दहशतवादविरोधी क्षमता पूर्णपणे तैनात करण्याचे आवाहन केले. तसेच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी सुरक्षा दल तैनात करण्याबाबत आणि दहशतवादविरोधी कारवायांबाबतही चर्चा केली. तसेच पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि इतर यंत्रणांना दहशतवाद्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा

काही दिवसांपूर्वी शिवखोडीला जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यात १० जणांचा मृत्यू झाला होता. हा भाग काश्मीर खोऱ्यातील इतर भागांच्या तुलनेत सुरक्षित मानला जात होता आणि तिथे दहशतवादी हल्ल्याच्या घटना देखील घडत नव्हत्या. मात्र या घटनेनंतर चित्र बदलले आहे. सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहिम अधिक तीव्र केली. ही घटना ताजी असतांनाच दहशतवादी हल्ल्याच्या आणखी ४ घटनांनी जम्मू काश्मीर हादरले आहे. या घटनेनंतर आता केंद्र सरकारने तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) परिस्थितीचा अंदाज घेतला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.