Russia and Ukraine War: रशियन लष्करात भरती झालेल्या २ भारतीयांचा युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू

मिळालेल्या वृत्तानुसार, अनेक भारतीय नागरिक रशियन सैन्यात भरती होऊन कर्तव्य बजावत आहेत.

121
Russia and Ukraine War: रशियन लष्करात भरती झालेल्या २ भारतीयांचा युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या २ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षात नुकताच २ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी, (११ जून) रोजी यासंदर्भातील एक निवेदन जारी केले होते. हे दोन्ही भारतीय नागरिक रशियन सैन्यात भरती झाल्याचे सांगण्यात आले होते. (Russia and Ukraine War)

मिळालेल्या वृत्तानुसार, अनेक भारतीय नागरिक रशियन सैन्यात भरती होऊन कर्तव्य बजावत आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवरील काही भागांत हे जवान तैनात केले आहेत. त्यांना रशियन सैन्याशी लढण्याच्या कामगिरीवर पाठवले जात आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्रालय आणि मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांची लवकर सुटका करावी, अशी भूमिका मांडली आहे तसेच त्यांना सुखरूप मायदेशी परतण्यासाठी हे प्रकरण नवी दिल्लीतील रशियन राजदूत आणि मॉस्कोमधील रशियन अधिकाऱ्यांकडे जोरदारपणे मांडले असल्याची माहिती आहे. (Russia and Ukraine War)

(हेही वाचा – General Insurance : विमा दाव्यांच्या पूर्ततेसाठी विमा नियामक मंडळाने आणले ‘हे’ नवीन नियम )

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने हे प्रकरण रशियाकडे मांडले आहे आणि रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांची लवकर सुटका करून परतण्याची मागणी केली आहे.

भारताने केली मागणी
दरम्यान, रशियन लष्कराकडून आमच्या नागरिकांची होणारी सर्व प्रकारची भरती थांबवावी, अशी मागणी भारताने केली आहे. असे कोणतेही उपक्रम आमच्या भागीदारीशी सुसंगत नसतील. यासोबतच भारताने रशियामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना रशियामध्ये नोकरी शोधताना काळजी घेण्याचीही विनंती केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.