भारताकडे मदतीचा हात मागणा-या युक्रेनने कधी भारताला मदत केली आहे का?

162

रशियाने युक्रेनवर गुरुवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यानेच तिस-या महायुद्धाची ठिणगी पडली आहे. भारताच्या पंतप्रधानांनी जर मध्यस्थी केली, तर कदाचित रशिया आक्रमण थांबवेल, कारण पंतप्रधान मोदी हे जगातील प्रभावी नेते आहेत, अशी युक्रेनच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना विनंती केली आहे. युक्रेनने भारताकडे मदत मागितल्याने आता भारत मदत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण त्याआधी जाणून घेऊया की, युक्रेनने कधी भारताची मदत केली आहे का? तर नाही…युक्रेनने कधीही भारताला मदत केलेली नाही.

साधी दखलही घेतली नाही

युक्रेन हा देश पहिल्यापासून भारताचा दुश्मन राहिला आहे. या संदर्भातील ट्वीट भारतीय चित्रपट निर्माता आणि सोशल अॅक्टिविस्ट अशोक पंडित यांनी केले आहे. युक्रेन या देशाकडे यूरेनियमचे भांडार होते. भारताने सतत मागणी करुनही  त्यावेळच्या पंतप्रधानांना युक्रेनकडून नकारच देण्यात आला. भारत ज्यावेळी ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमच्या शोधात होता, तेव्हा युक्रेनने समोर बसून साधी चर्चा सुद्धा केली नाही. युक्रेन हा देश अल कायदाला समर्थन करणारा देश आहे. अशा आशयाचे ट्वीट अशोक पंडीत यांनी केले आहे.

( हेही वाचा :‘सामना’तून टीकास्त्र; मोदी-शहा हिटलर, तर केंद्रीय तपास यंत्रणा ‘या’ नाझी फौजा! )

युक्रेनच्या नागरिकांशी सहानुभूती

एक भारतीय म्हणून मला युक्रेनविषयी अजिबात सहानुभूती नाही. कारण जेव्हा भारतावर प्रतिबंध घातले गेले, तेव्हा युएनओ मध्ये भारताला प्रतिबंधित करण्यासाठी वोट करणारा एक देश हा युक्रेन होता, असं ट्वीट अशोक पंडित यांनी केले आहे. आता युक्रेनचे काय होणार यावर माझं काहीही मत नाही. पण, युक्रेनच्या नागरिकांशी सहानुभूती नक्कीच आहे. या कमजोर देशासोबत तेच होतय जे 1947 मध्ये नेहरूंच्या नेतृत्त्वाखाली भारताचं झालं होत. असं ट्वीट करत पंडित यांनी युक्रेनने भारताला कधीही मदत केली नसल्याचे सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.