आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तीन दिवस सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी ते ते देश परकोटीचे प्रयत्न करत आहेत. भारतानेही यात बाजी मारली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या प्रयत्नामुळे अखेर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणत आहेत. पहिल्या टप्प्यात २१९ विद्यार्थांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत पोहोचले.
रोमानिया से 219 भारतीयों का पहला दल स्वदेश पहुंचा।
— Panchjanya (@epanchjanya) February 26, 2022
केंद्रीय मंत्री गोयल यांनी केले स्वागत
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7 वाजून 55 मिनीटांनी विमान दाखल झाले. 219 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघाले आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मायभूमीत परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात येथील आहेत.
Union Minister Piyush Goyal welcomes Indian students evacuated from Ukraine at Mumbai Airport pic.twitter.com/eqUfOuViyw
— ANI (@ANI) February 26, 2022
(हेही वाचा #RussiaUkraineWar: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा मोदींना फोन! काय केली मागणी?)
Join Our WhatsApp Community