रशिया -युक्रेन सीमेच्या रडारवर काही रहस्यमयी लढाऊ विमान दिसून आली आहेत. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे गुरुवारपासून चार दिवस युरोप दौ-यावर आहेत. यावेळी ते युक्रेनच्या बाजूचा देश पोलंडमध्ये येणार आहेत. त्यामुळे युद्धभूमीवर आढळून आलेली विमान ही महासत्ता या युद्धात उतरण्याचे तर संकेत नाहीत ना.. अशी चर्चा रंगली आहे.
महासत्ता उतरणार?
गेल्या 28 दिवसांपासून रशिया – युक्रेन युद्ध सुरु आहे. याच दरम्यान, नाटोच्या सैन्याने रशियाच्या सिमेवर युद्धसराव सुरु केला, त्यात थोडे थोडके नव्हे तर 30 देशांचे सुमारे 30 हजार सैनिक या युद्धसरावामध्ये उतरले होते. यात अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या युद्दनौकाही होत्या.
तिस-या महायुद्धाला होणार सुरुवात
रशियाने हे युद्ध जिंकण्यासाठी आता व्हॅक्यूम बाॅम्ब, फाॅस्फरस बाॅम्बदेखील वापरण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या नागरिकांच्या वसाहतींवरही हल्ले केले. रशियाने मानवतेच्या सर्व मर्यादा पार केल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तिस-या महायुद्दाला सुरुवात होणार असल्याचे इशारे दिले. त्यामुळे आता या युद्धात कोणता देश युक्रेनच्या बाजूने उतरणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा अनुसूचित जाती – जमातींचा निधी पडून! )
अद्याप जगाला कल्पना नाही
या युद्धादरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर गेल्या मागच्या काही दिवसांमध्ये वेगळीच लढाऊ विमाने ट्रेस करण्यात आली आहेत. ही विमाने दोन्ही देशांची नव्हती. तसेच, या विमानांवर खतरनाक मिसाईल लादलेली होती. पण, तरीही ही विमानं कोणाची होती ही माहिती अद्याप जगाला देण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community