सध्या रशिया-युक्रेन यांच्यामधील सुरू असलेले युद्ध घनघोर युद्धात रूपांतरीत होत आहे. कालपर्यंत मिसाईल, क्षेपणास्त्र डागणारा रशिया आता अधिक शक्तीशाली शस्त्रे वापरू लागला आहे. रशियाने या युद्धात युक्रेनवर व्हॅक्युम बाॅम्बने हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युद्धाच्या वेळी हा बाॅम्ब वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या व्हॅक्युम बाॅम्बवर प्रतिबंध घालण्यात आला आहे, तो हवेतील ऑक्सिजन शोषून घेतो, असा हा बाॅम्ब आहे तरी काय, हे जाणून घेऊया.
व्हॅक्यूम बॉम्ब हा एक सुपर-शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब आहे. ज्याचा स्फोट 44 टन पेक्षा जास्त आहे. या बाॅम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे म्हटले जाते. हा बाॅम्ब 300 मीटरच्या त्रिज्येमध्ये नुकसान करू शकतो. हे विध्वंसक शस्त्र जेटमधून टाकले जाते आणि हवेच्या मध्यभागी त्याचा स्फोट होतो.
2007 मध्ये करण्यात आला आविष्कार
या बॉम्बची गणना जगातील सर्वात घातक अण्वस्त्रांमध्ये केली जाते. हे 2007 मध्ये रशियाने विकसित केले होते. 7 हजार 100 किलो वजनाचा हा बॉम्ब जेव्हा एखाद्या देशावर टाकला जातो, तेव्हा तो वाटेतल्या इमारती आणि माणसांचा नाश करतो. याला एरोसोल बॉम्ब असेही म्हणतात. पोर्ट्समाउथ युनिव्हर्सिटीचे पीटर ली म्हणतात की, रशियाने 2016 मध्ये सीरियावर या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला होता. हा अतिशय धोकादायक बॉम्ब आहे.
300 मीटरमध्ये नुकसान
फादर ऑफ ऑल बॉम्ब 300 मीटरच्या त्रिज्येमध्ये नुकसान करू शकतो. हे विध्वंसक शस्त्र जेटमधून टाकले जाते आणि हवेच्या मध्यभागी त्याचा स्फोट होतो. हा बाॅम्ब हवेतून ऑक्सिजन बाहेर काढतो आणि लहान आण्विक शस्त्राप्रमाणेच प्रभाव निर्माण करतो.
ऑक्सिजन स्फोटक बनवतो
व्हॅक्यूम बॉम्ब हा रशियाने विकसित केलेल्या नवीन संकल्पनेवर आधारित स्फोटक शस्त्र आहे. या शक्तिशाली बॉम्बमुळे अण्वस्त्रांप्रमाणे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. हा बॉम्ब केवळ वातावरणातील हवेचा स्फोटक इंधन म्हणून वापर करतो.
( हेही वाचा: विलीनीकरणासाठी आता एसटी कर्मचारी मंत्र्यांच्या दारी! )
बॉम्ब बनवण्यात अमेरिकेचाही हात
हा धोकादायक बॉम्ब तयार करण्यामागे अमेरिकेचा सर्वात मोठा हात आहे. अमेरिकेने 2003 मध्ये ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ तयार केला होता, ज्याचे नाव GBU-43/B आहे. तो 11 टन टीएनटीच्या सामर्थ्याने विस्फोट करू शकतो, तर रशियन बॉम्ब 44 टन टीएनटीच्या शक्तीने स्फोट करण्यास सक्षम आहे. अमेरिकेने तयार केलेल्या बॉम्बला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ तयार केला.
व्हॅक्यूम बॉम्बची शक्ती अण्वस्त्रांच्या बरोबरीची
हा बाॅम्ब विमानातून सोडला जाऊ शकतो, तसेच जमिनीवरून टाकता येतो. ठराविक उंचीवर नेल्यानंतर, या बॉम्बचे इंधन ऑक्सिजनमध्ये मिसळून ढगांवर पसरते. त्यानंतर या ढगांचा स्फोट होताच, त्याच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू किंवा इमारती नष्ट होतात. हवेत स्फोट घडवणाऱ्या या व्हॅक्यूम बॉम्बची शक्ती अण्वस्त्रांइतकी असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community