धक्कादायक! युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून करतेय वापर!

150

सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याचे आव्हान मोदी सरकारसमोर आहे. त्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केले आहे. मात्र त्यासाठी आता युक्रेनचा धोंडा म्हणून उभा आहे, असे चित्र आहे.

काय म्हणते रशिया?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले. आमचे लष्कर कीव आणि खारकीवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास पूर्णपणे मदत करत आहे. परंतु युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे, तसेच भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मानवी ढाल बनवत आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना रोखले जात आहे, असा खळबळजनक दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

(हेही वाचा आता ‘ऑपरेशन गंगा’साठी आणखी एका दलाचा सहभाग!)

युक्रेनचा दावा निराळा 

याचदरम्यान युक्रेनकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी एक कॉरिडोअर तयार करण्यासाठी रशियासोबतच चर्चा करु, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करत भारत आणि अन्य देशांना आवाहन केले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे खारकीव, सुमीसह अन्य शहरात आपल्याला अडकलेल्य़ा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मानवी कॉरिडोअर बनवण्यास रशियाची चर्चा करा असे युक्रेनने भारत, पाकिस्तान आणि चीनला सांगितले. जे भारतीय विद्यार्थी अडकले आहेत त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली जावी, अशी मागणी भारताने रशियाकडे केली होती. तर दुसरीकडे यादरम्यान रशियानेच युक्रेनवर गंभीर आरोप केले. जे रणगाडे रोखले जात आहेत, त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले, तर दुसरीकडे पोलंडमध्ये बॉर्डर गार्ड्सने १०० भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने पाठवए असल्याचा दावा बेलारुसच्या राजदूतांना युएनमध्ये केला.

ही अफवाच! परराष्ट्र खात्याचा खुलासा

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनने ओलिस ठेवल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही माहिती म्हणजे केवळ अफवाच असल्याचं स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. युक्रेनमधला भारतीय दूतावास तिथल्या भारतीय नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहे. युक्रेन प्रशासनाच्या सहकार्याने अनेक जणांनी खारकीव्ह सोडले आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना ओलिस ठेवल्याविषयीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. बचावकार्य सातत्याने सुरू आहे, असे सांगत ही केवळ अफवाच असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.