#RussiaUkraineWar: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा मोदींना फोन! काय केली मागणी?

102

रशिया-युक्रेन युद्धाचा हा तिसरा दिवस आहे. हे युद्ध आता जास्त चिघळल्याचं पहायला मिळत आहे. नाटो देशांनी हात वर केल्यामुळे युक्रेन जगाच्या पाठीवर एकटा पडल्याचे दिसत आहे. भारताने युद्धाच्या बाबतीत घेतलेल्या तटस्थ भूमिकेनंतर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी भारताची मदत मागितली आहे. झेलेन्स्किंनी ट्वीट करत मोदींशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

भारताकडे मागितला मदतीचा हात

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. रशियाच्या हल्ल्याबाबत त्यांना माहिती दिली. १ लाखाहून अधिक रशियन सैन्य हे युक्रेनच्या भूमीवर कब्जा करुन बसले आहेत. अतिशय क्रूरपणे रशियन सैन्य इथल्या इमारतींवर हल्ला करुन त्या उद्ध्वस्त करत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने आपल्याला राजकीय पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याचे वलोदोमीर झेलेन्स्की(volodymyr zelensky) यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

काय आहे भारताची भूमिका?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनवर हल्ला करणा-या रशिया विरोधात ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले होते. यावेळी भारतामध्ये अत्यंत धोरणीपणा दाखवत रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला, परंतु मतदान टाळले. भारतासोबच मतदानापासून दूर राहणाऱ्या देशांमध्ये चीन आणि यूएई या देशांचाही समावेश आहे. रशियाने भारताच्या या तटस्थ भूमिकेचे कौतुक केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.