अमेरिकेसह ‘नाटो’ देशांकडून युक्रेनला अधिक मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठा होत आहे. त्या बळावर युक्रेन हा रशियन सैन्याचा प्रचंड विध्वंस करत आहे. सलग 23 दिवस उलटले तरी युक्रेन हार मानत नाही, त्यामुळे अखेर रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र किन्झाल युक्रेनवर डागले आहे.
किन्झाल क्षेपणास्त्राला कोणाकडेही तोड नाही
रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र किन्झाल वापरून युक्रेनमधील पाश्चात्य शस्त्रांचे गोदाम नष्ट केल्याचे जाहीर केले आहे. रशियाने युक्रेनमध्ये डागलेल्या किन्झाल क्षेपणास्त्राला अमेरिकेसह जगातील कोणत्याही देशाकडे पर्यायी क्षेपणास्त्र उपलब्ध नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी या क्षेपणास्त्राला ‘आदर्श शस्त्र’ म्हणून वर्णन केले होते. तेच हे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र शहराच्या बाहेर असलेल्या आणि पर्वतांनी वेढलेल्या युक्रेनमधील डेलयाटिन या गावावर धडकले. हे क्षेपणास्त्र मिग-३१ सुपरसॉनिक फायटर जेटमधून डागण्यात आले.
(हेही वाचा आता ‘द गोवा फाईल्स’ चित्रपटाची मागणी! कोणी आणि कसे केले होते हिंदूंवर अत्याचार?)
काय आहेत किन्झाल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये?
- आवाजाच्या 10 पट वेगाने उड्डाण करण्याची क्षमता किन्झाल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची आहे.
- हे क्षेपणास्त्र पुतिन यांनी 2018 साली देशाला समर्पित केले होते. हे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता राखून आहे.
- अमेरिका सध्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे.
- किन्झाल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र 2000 किमीपर्यंत मारा करू शकते.
- पारंपरिक स्फोटकांव्यतिरिक्त, किन्झाल क्षेपणास्त्र 500 किलोटनचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
- हे अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 33 पट अधिक शक्तिशाली असू शकतात.
- किन्झाल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र 3 किमी प्रति सेकंद वेगाने हल्ला करण्यास सक्षम आहे.
- अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणाही समोर अपयशी ठरत आहे.