Russia केव्हाही India च्या मदतीला येणार; महत्त्वाच्या युद्धकराराची तयारी

दोन्ही देश एकमेकांच्या देशात आपले सैन्य तैनात करू शकतील, अशा कराराची चर्चा करण्याचे आदेश रशियाचे (Russia) पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाला दिले आहेत.

190
Russia केव्हाही India च्या मदतीला येणार; महत्त्वाच्या युद्धकराराची तयारी
Russia केव्हाही India च्या मदतीला येणार; महत्त्वाच्या युद्धकराराची तयारी

भारत-बांगलादेश युद्धाच्या (Indo-Bangladesh War) वेळी अमेरिका भारतावर चाल करून येत असतांना रशियाला (Russia) समजताच त्यांनी आपल्या युद्धनौका अमेरिकेच्या मागावर पाठवून दिल्या होत्या. यापूर्वी आणि यानंतरही रशिया भारताच्या वेळोवेळी मदतीला धावून आला आहे. गेल्या वर्षी रशिया – युक्रेन युद्ध (russia ukraine war) सुरु असतांना युद्ध थांबविण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, रशियाच्या विरोधात भूमिका मांडावी; म्हणून अमेरिका, युरोपसह जगभरातून प्रचंड दबाव टाकला जात होता. भारताने रशियाविरोधात भूमिका घेतली नाही. जेव्हा अमेरिका, युरोप भारताविरोधात उभा ठाकलेला, तेव्हा एकटा रशियाच होता, ज्याने भारताला साथ दिली होती. आज जगात भारत आणि रशियाची मैत्री प्रसिद्ध आहे. या मैत्रीतून नव्या संरक्षण करारांकडे पाऊल टाकले जात आहे.

(हेही वाचा – Pune Accident : माझा पुतण्या पळून गेला नाही; अपघातानंतर आमदार Dilip Mohite Patil यांचा खुलासा)

वेळोवेळी एकमेकांना मदत करणाऱ्या दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाचा करार होऊ घातला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या देशात आपले सैन्य तैनात करू शकतील, अशा कराराची चर्चा करण्याचे आदेश रशियाचे (Russia) पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाला दिले आहेत.

या नव्या करारामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील तैनाती आणि रसद पुरविणे सोपे जाणार आहे. संयुक्त सराव आणि प्रशिक्षण, मानवतावादी मदत आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सैन्य पाठवण्याची तरतूद या करारात करण्यात येणार आहे. पाचपेक्षा जास्त युद्धनौका, 10 विमाने आणि तीन हजार सैन्य हे दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी पाठवू शकणार आहेत. यामुळे हवाई, समुद्री आणि जमिनीवरील दोन्ही देशांची ताकद वाढणार आहे. (Russia)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.