Russian airstrike in Syria: रशियाचे सिरियावर हवाई हल्ले, 120 बंडखोरांचा मृत्यू

गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरूच आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव कायम असताना आता रशियाने मध्य-पूर्व आशियातील सिरिया देशावर देखील हल्ला चढवला आहे. रशियाने गुरुवारी सिरियावर हवाई हल्ले चढवले आहेत. यामध्ये 120 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ठार झालेले हे सर्वजण बंडखोर असल्याचे सांगितले जात आहे.

रशियाचा हवाई हल्ला

वायव्य सिरियातील अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या निसरा फ्रंटच्या ठिकाणांवर रशियन लढाऊ विमानांनी जोरदार हवाई हल्ला केला आहे. यामध्ये नुसरा फ्रंटची अनेक स्थाने उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सना या वृत्तसंस्थेने रशियातील सैनिकी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.सिरियातील इदलिब प्रांतातील शेख युसूफ भागात रशियन विमानांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात नुसरा फ्रंटचे ऑब्जर्वेशन पॉइंट्स,ड्रोन आणि मिसाईल लॉन्चर्स नष्ट करण्यात आले आहेत.

एकूण 14 हवाई हल्ले

इदलिब भागावर नुसरा फ्रंटसारख्या कट्टरपंथी गटांप्रमाणे इतरही काही गटांनी आपला ताबा मिळवला आहे. त्यामुळे बंडखोरांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन फायटर जेटने या भागात गुरुवारी एकूण 14 हवाई हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here