रशियाने अखेर युक्रेन वर सैनिकी कारवाई सुरू केली असून, पहिल्याच प्रयत्नात युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अशावेळी हे युद्ध कोणाच्या बाजूने झुकणार आहे हे लक्षात आले आहे. मात्र, त्याचवेळी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी नाटोच्या सर्व देशांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. या कारवाईत कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची हिंमत दाखवू नये, अन्यथा त्यांनी आजवर कधीही पाहिले नसतील इतके भयानक परिणाम त्यांना पहावे लागतील, अशा शब्दांत पुतीन यांनी अप्रत्यक्षपणे तिसऱ्या महायुद्धला सुरुवात करू, अशी धमकी दिली आहे.
आम्ही युद्ध करु
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पुतिनच्या या आक्रमक युद्धापासून स्वत:चा बचाव युक्रेन करेल आणि जिंकेलही असे युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा: #RussiaUkraineConflict: युद्धाला अखेर सुरुवात, युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित! )
‘असा’ चिघळला वाद
रशिया काही तासांतच युक्रेनवर आक्रमण करेल या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे पाऊल पुढे आले आहे. रशियाने यापूर्वी म्हटले होते की फुटीरतावाद्यांनी क्रेमलिनकडे युक्रेनियन “आक्रमकता” परतवून लावण्यासाठी मदत मागितली होती आणि स्फोटांनी डोनेस्तकच्या पूर्वेकडील शहर हादरले होते. आता काही दिवसांपासून, रशिया-युक्रेन सीमेवर रशियन लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात आहे. पुतिन यांनी युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर आणि त्यांना शांतीरक्षक म्हणून तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर तणाव वाढला होता.