रशियाने नवव्या दिवशीही युद्ध सुरूच ठेवले आहे. आजच्या दिवशी अर्थात शुक्रवारी रशियाने थेट युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक सुरु केली आहे. त्यामुळे या प्लांटला आग लागली आहे. हा युक्रेनचा सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे, येथे 6 अणुभट्ट्या आहेत.
अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट
गेल्या दोन दिवसांपासून रशियन सैन्याची या शहराकडे वाटचाल सुरू होती. आता इथे जबरदस्त बॉम्बहल्ले सुरु आहेत. या हल्ल्यामुळे धोकादायक अपघाताचा इशारा देण्यात आला आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की, प्लांटमधून धूर निघताना दिसत आहे. रशियाने युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन अधिकार्यांचा दावा आहे की, हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत आहेत.
(हेही वाचा दहशतवाद विरोधी पथक कोणाच्या दहशतीखाली? वाचा पोलीस दलातील धक्कादायक परिस्थिती…)
चोरनोबिलपेक्षा 10 पट मोठा स्फोट
युक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने मोठी बातमी दिली आहे. युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून धूर निघताना दिसत आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आगीनंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ले मागे घेण्याचे आवाहन रशियन सैन्याला केले आहे. कुलेबा यांनी ट्विट केले की, जर तो स्फोट झाला तर तो चोरनोबिलपेक्षा 10 पट मोठा स्फोट असेल! रशियन लोकांनी आग त्वरित थांबवली पाहिजे. रशियाने युक्रेनमधील एनरहोदर शहरावर हल्ला केला आहे. एनरहोदर हे युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्टच्या उत्तर-पश्चिम भागातील एक शहर आणि नगरपालिका आहे. एनरहोदर झापोरिझ्झियापासून काही अंतरावर आहे. एनरहोदर, निकोपोल आणि चेर्वोनोह्रीहोरिव्हका समोर, काखोव्का जलाशयाजवळ नीपर नदीच्या डाव्या तीरावर स्थित आहे.
पुन्हा अणुयुद्धाचा धोका वाढला
रशिया आणि युक्रेनमधील लढत निर्णायक वळणावर पोहोचताना दिसत नाही. या युद्धात पुन्हा अणुयुद्धाचा धोका वाढला आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रे रशियाच्या लक्ष्यावर आहेत. यापूर्वी 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु प्रकल्प ताब्यात घेतला होता.
Join Our WhatsApp Community