अमेरिकेच्या दबावानंतरही रशिया Russia – युक्रेनची लढाई सुरूच आहे. युक्रेनने रशियावर ड्रोनने हल्ले केले. त्यानंतर रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करून युक्रेन उद्धवस्त केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे तसेच चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाने Russia युक्रेनमधील ओदेशा बंदरावर गहू भरत असलेल्या एका जहाजावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले.
(हेही वाचा बाजारात ७० टक्के Paneer भेसळयुक्त; विधानसभेत भाजपाच्या आमदाराचा पर्दाफाश)
ओदेशामधील लष्करी अधिकारी ओलेन कायपर यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी करण्यात आलेल्या या हल्ल्यासाठी रशियाकडून Russia बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. ओदेशा बंदरावर करण्यात आलेल्या हल्ल्यादरम्यान, एक क्षेपणास्त्र बार्बाडोसचा झेंडा असलेल्या एमजे पिनार या जहाजावर आदळले. त्यामुळे या जहाजाचे नुकसान झाले. तसेच या हल्ल्यात चार सिरियाई नागरिक मारले गेले. दरम्यान, मंगळवारी सकाळी युक्रेनने रशियावर Russia जोरदार ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे रशियाची राजधानी मॉस्कोमधील अनेक इमारतींना आग लागली होती. शहराच्या दिशेने झेपावत असलेले ६० ड्रोन नष्ट करण्यात आल्याची माहिती मॉस्कोचे महापौर सर्गैई सोबयानिन यांनी दिली होती.
Join Our WhatsApp Community