युक्रेनला हरवणे आता रशियाला जवळपास अशक्य होऊ लागले आहे. नाटो देशांच्या पाठिंब्यामुळे हे युद्ध लांबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आता आण्विक हल्ल्याच्या तयारीत आहेत का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण आण्विक हल्ल्याची क्षमता असलेली रशियाची सर्वात मोठी पाणबुडी अचानक गायब झाली आहे. ही पाणबुडी गेली कुठे हे केवळ रशियालाच माहित आहे, मात्र यामुळे नाटोच्या देशांची झोप उडाली आहे.
अणुबॉम्बची चाचणी घेतली जाण्याची शक्यता
रशियाची आर्कटिकहून निघालेली सर्वात शक्तीशाली अण्वस्त्रवाहू पाणबुडी मध्येच गायब झाली आहे. ही पाणबुडी कुठे आहे हे रशियाशिवाय कोणालाच माहिती नाही. पुतीन यांच्या आदेशावरून रशियाने बेलगोरोड ही पाणबुडी तैनात केली होती. या पाणबुडीद्वारे जगातील सर्वात खतरनाक पाण्याखालील पोसायडन ड्रोनद्वारे अणुबॉम्बची चाचणी घेतली जाण्याची शक्यता, नाटोने व्यक्त केली आहे. या स्फोटाने एवढी शक्ती निर्माण होते की, १६०० फुटांपर्यंत त्सुनामी तयार होते. यामुळे अख्खे शहरच्या शहर या त्सुनामीत बरबाद होऊ शकते. जर ही चाचणी झाली तर ती पश्चिमेकडील देशांना ही एक गर्भित धमकी असणार आहे. 600 फूट लांबीच्या पाणबुडीचा जगातील सर्वात मोठ्या पाणबुड्यांमध्ये समावेश होतो. या दोन्ही ठिकाणचे अंतर ३००० मैल एवढे आहे. यामुळे ही पाणबुडी कोणत्या समुद्रात जाऊन लपेल हे नाटोलाही समजलेले नाही.
(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)
Join Our WhatsApp Community