परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (S. Jaishankar) दि. ४ मार्चपासून युनायटेड किंग्डम (United Kingdom) आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दि. ३ मार्च रोजी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे भारताच्या ब्रिटन आणि आयर्लंडसोबतच्या (Ireland) मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
( हेही वाचा : मुंबई क्रिकेटचा हिरा हरपला; सुप्रसिद्ध फिरकी गोलंदाज Padmakar Shivalkar यांचे निधन)
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनच्या दौऱ्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar)समकक्ष परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी (David Lammy) यांच्याशी चर्चा करतील आणि इतर अनेक प्रमुख व्यक्तींसह भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटतील. जयशंकर ६ आणि ७ मार्च रोजी आयर्लंड (Ireland) दौऱ्यात त्यांचे आयर्लंड समकक्ष सायमन हॅरिस (Simon Harris) , इतर मान्यवर आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटतील, असे मंत्रालयाने सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community