‘या’ देशाने एकाच दिवशी दिली 81 जणांना फाशी! काय आहे कारण?

163

दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या गुन्ह्यांमध्ये सौदी अरेबियाने एकाच दिवशी तब्बल 81 जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. एकाच दिवशी फासावर चढवण्यात आलेल्या गुन्हेगारांची इतकी मोठी संख्या ही गेल्या वर्षभरात मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगारांच्या संख्येइतकी असल्याचे समजत आहे.

दहशतवादी हल्ल्याचा होता कट

सौदी प्रेस एजन्सीने याबाबतची माहिती दिली आहे. फाशी देण्यात आलेले हे सर्व 81 आरोपी अल-कायदा, हुथी बंडखोर संघटना आणि इतर काही दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे सौदी अरेबियाकडून सांगण्यात येत आहे. या सर्व गुन्हेगारांचा सौदी अरेबियात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा डाव होता. यामध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता, असे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. तसेच सरकारी कर्मचारी आणि महत्वाच्या आर्थिक संस्थांना लक्ष्य करुन अनागोंदी माजवण्याचा त्यांचा हेतू होता. अपहरण, अत्याचार, बलात्कार, तस्करी, शस्त्रास्त्रे आणि बॉम्बस्फोट अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील त्यांचा संबंध असल्याचे सौदीकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः रशिया-युक्रेन युद्धावर बोलणारे काश्मिरी हिंदुंवरील अत्याचारांबाबत गप्प का?)

आपण त्यांच्याकडून शिकायला हवे- रणजित सावरकर

सौदी अरेबियन सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ट्वीट केले आहे. सौदी अरेबियात एकाच वेळी 81 इस्लामी जिहादींना फाशी देण्यात आली आहे. आपणही त्यांच्याकडून शिकायला हवं, असं ट्वीट करत रणजित सावरकर यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणा-यांना कठोर शिक्षा करणे योग्य असल्याचे म्हटले आहे.

ज्या 81 लोकांना फाशी देण्यात आली आहे. त्यात 73 सौदी नागरिक, सात येमेनी आणि एक सीरियाचा नागरिक आहे. या सर्वांवर सौदी न्यायालयात खटले चालवले गेले आणि 13 न्यायाधीशांनी या प्रकरणांची देखरेख केली. सौदी सरकार अशाप्रकारे दहशतवादी कारवाया करणा-यांविरोधात यापुढेही अशीच कठोर पावले उचलेल आणि कट्टरपंथीयांविरोधात अशीच कारवाई करत राहील. विविध गुन्ह्यांमध्ये दोषी गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात आखाती देश हे कायमंच आघाडीवर राहिले आहेत. मानवाधिकार संघटना आणि अनेक पाश्चिमात्य देश यावरून त्यांच्यावर टीका करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.