अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी (John F. Kennedy) यांच्या हत्येच्या प्रकरणी रशियातील एका वृत्तसंस्थेने खळबळजनक ट्विट केले आहे. जॉन एफ. केनेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या वेळी १९६३ साली म्हणजे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा सीआयए (CIA) संदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रे समोर आली आहेत. (US Intelligence Agencies)
(हेही वाचा – गेल्या १० वर्षात ED चा १९३ नेत्यांवर गुन्हा दखल; शिक्षा फक्त दोघांनाच )
यापूर्वी २०१३ साली भारताच्या पीटीआय वृत्तसंस्थेने सीआयएच्या भारतातील गुप्त मोहिमांविषयी माहिती समोर आणली होती. भारताने सीआयएला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ओडिशातील चारबतिया हवाईतळ (Charbatia Air Base) वापरण्यास परवानगी दिली होती.
रशियातील वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार, भारताने सीआयएला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ओडिशातील चारबतिया हवाईतळ वापरण्यास परवानगी दिली होती. केनेडी यांच्या हत्याप्रकरणासंदर्भात जी कागदपत्रे समोर आली आहेत. त्यामध्ये भारतातील सीआयएच्या गुप्त तळाचा उल्लेख आहे. भारतातील या तळांना ब्लॅक साईटस म्हणून संबोधले जाई. सीआयएकडून या तळांचा वापर गुप्त मोहिमा आणि दहशतवाद्यांना डांबून ठेवण्यासाठी केला जात असे, अशी माहिती रशियन वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.
या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानातील रावळपिंडी, श्रीलंकेतील कोलंबो, इराणमधील तेहरान, दक्षिण कोरियातील सेऊल आणि टोकियोत सीआयए संस्थेचे गुप्त तळ असल्याचीही माहिती समोर आली आहे. (US Intelligence Agencies)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community