जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दलांनी आज, मंगळवारी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. स्थानिक एसएसपी कार्यालयाजवळ ही चकमक सुरू आहे. काही दहशतवादी हल्ल्याच्या हेतूने येथे पोहचले होते. त्यांनी कुठलीही आगळीक करण्यापूर्वीच सुरक्षा दलांना याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले.

( हेही वाचा :प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना )

सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी बडगाम येथील न्यायालय संकुलात हल्ला करण्याच्या तयारीत होते.  माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला. परिसर रिकामा करण्यात आला. पोलिसांनी रस्त्यावर कडक बंदोबस्त लावला. दरम्यान, दहशतवाद्यांना अडकल्याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरू केला. लष्कराचे जवान, पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. अल्पावधीतच 2 दहशतवादी मारले गेले. यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. ज्याप्रकारे या परिसरात सतत गोळीबार सुरू होता त्यावरून तेथे आणखी 3 ते 4 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here