जगभरात मोठ्या देशांकडे लढाया लढण्यासाठी सैन्याचा तुटवडा; Brigadier Hemant Mahajan यांनी मांडले वास्तव

सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शनिवार, २७ जुलै रोजी स्मारकातील मादाम कामा सभागृहात कारगिल विजयाच्या २५व्या वर्षानिमित्ताने आयोजित 'गाथा पराक्रमाची' या विषयावरील व्याख्यानात ब्रिगेडीयर हेमंत महाजन (Brigadier Hemant Mahajan) बोलत होते.

131

शस्त्र चालवणारा सैनिक हा शस्त्रापेक्षा महत्वाचा असतो, कारण आज जगात विविध ठिकाणी युद्ध सुरु आहेत, त्यामध्ये मोठी शस्त्रे वापरली जात आहेत. पण तरीही रशिया-युक्रेन युद्धात रशिया अजून युद्ध जिंकत नाही. कारण रशियाकडे आता सैनिक नाहीत. जे सैनिक राहिले आहेत, ते लढायला तयार नाहीत. अशीच अवस्था आज मोठ्या राष्ट्रांची बनली आहे, अशी माहिती ब्रिगेडीयर हेमंत महाजन (Brigadier Hemant Mahajan) यांनी दिली.

…म्हणून रशिया आणि इस्रायल युद्ध जिंकत नाही 

सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शनिवार, २७ जुलै रोजी स्मारकातील मादाम कामा सभागृहात कारगिल विजयाच्या २५व्या वर्षानिमित्ताने आयोजित ‘गाथा पराक्रमाची’ या विषयावरील व्याख्यानात ते (Brigadier Hemant Mahajan) बोलत होते. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते. ‘नाटो’कडेही सैनिक नाहीत. त्यामुळे युक्रेनला ते सैनिक पुरवू शकत नाहीत. ‘नाटो’ शोभेचे बाहुले बनले आहे. आता या युद्धात रशिया भाडोत्री सैनिक भरती करत आहेत. त्यात भूतान, भारत, बांगलादेश येथून नागरिकांना युद्धात सहभागी करून घेत आहे. आता रशियाने जेलमधील कैद्यांना सैन्यात भरती केले आहे. आतापर्यंत ८ हजाराहून अधिक रशियाचे कैदी या युद्धात मारले गेले आहेत. रशियाकडे आज लढाई लढाईला सैन्यच उरले नाहीत. हीच अवस्था इस्रायलची झाली आहे. त्यामुळे सध्या जी शस्त्रसंधी लागू आहे, त्यामागे हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे कुणाकडे कितीही आधुनिक शस्त्रे असली तरी सैन्य बळ नसेल तर त्याचा उपयोग शून्य आहे, असेही ब्रिगेडीयर महाजन (Brigadier Hemant Mahajan) म्हणाले.

(हेही वाचा Naxalite Surrender: महिला नक्षलीचे छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण; १३ लाखांचे बक्षीस केले होते जाहीर)

कारगिलच्या युद्धात तंत्रज्ञानाचा उपयोग झाला नाही

कारगिल हा इतिहास आहे, त्यातून शिकले तर फायदा होईल. कारगिल युद्धात जे सैनिक, अधिकारी लढले त्यांची सेवा ८ महिने, १ वर्ष, ३ वर्षांपर्यंत झालेली आहे. पण त्यांच्यात लढाई लढण्याची उर्मी होती. या युद्धात तंत्रज्ञानाचा फारसा उपयोग नव्हता. तिथे फक्त शौर्य, धैर्य, हिंमत आणि नेतृत्व या गुणांची आवश्यकता होती. इथे गेलेल्यांपैकी सर्वांना माहित होते की, त्यांच्यापैकी ५० टक्के तरी परत येणार नाहीत, तरीही लढाईला गेले. हे युद्ध झाल्यावर जे जिवंत सैनिक परतले, त्यापैकी अनेकांची लग्ने ठरलेली होती, त्यापैकी ९९ टक्के जणांची लग्ने मोडली होती, असेच ब्रिगेडीयर महाजन म्हणाले.

कारगिल युद्ध पुन्हा होईल का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण आता त्या भागात भारताचे पेट्रोलिंग वाढलेले आहे. पण आपली ५८० द्वीप समुद्रात आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणी कुणी राहत नाहीत, ती ठिकाणे तस्करांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत, त्यावर पाकिस्तानने कब्जा केला तर ते अधिक काळ तिथे राहू शकणार नाही, समुद्री शक्ती आपली तेवढी आहे, असेही ब्रिगेडीयर महाजन म्हणाले. पाकिस्तान पुन्हा भारताशी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही. पण तो दहशतवादी कारवाया वाढवू शकतो. त्याचबरोबर भारतात जे पाकिस्तान समर्थक नेते मंडळी, संस्था आहेत, ते अधिक धोकादायक आहेत, असेही ब्रिगेडीयर महाजन म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.