आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे Shubanshu Shukla ठरले पहिले भारतीय ; NASA ची माहिती

37
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे Shubanshu Shukla ठरले पहिले भारतीय ; NASA ची माहिती
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे Shubanshu Shukla ठरले पहिले भारतीय ; NASA ची माहिती

भारतीय वायुसेनेचे (IAF) अधिकारी शुभांशु शुक्ला (Shubanshu Shukla ) यांची NASA च्या Exium Mission 4 साठी पायलट म्हणून निवड झाली आहे. लवकरच ते स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानासह (SpaceX Dragon spacecraft) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. ISS मध्ये जाणारे शुभांशू हा पहिला भारतीय असतील. हे मिशन 14 दिवस चालणार आहे. या अंतर्गत संशोधन केले जाणार आहे. शुभांशू इस्रोच्या गगनयान मिशनसाठी प्रशिक्षण घेत आहेत. (Shubanshu Shukla )

हेही वाचा-Donald Trump यांची ब्रिक्स देशांना धमकी ; ब्रिक्स चलनापासून अमेरिकेला काय आहे धोका ?

पेगी व्हिटसन या मिशनचे नेतृत्व करतील. शुभांशू (Shubanshu Shukla ) पायलट असतील. त्यांच्यासोबत, मिशन विशेषज्ञ स्लावोज उझनान्स्की-विष्णीव्स्की आणि टिबोर कापू एप्रिल ते जून 2025 दरम्यान एक्झियम मिशन-4 वर जातील. NASA ने Exium Mission 4 वर पत्रकार परिषद घेतली. ज्यात पायलट शुभांशू (Shubanshu Shukla ) यांनी सांगितले की, ते ज्या मिशनवर जात आहेत, त्यामध्ये ते काही भारतीय खाद्यपदार्थही सोबत घेऊन जातील आणि आपल्या सहकाऱ्यांनाही खाऊ घालतील. अंतराळात योगासने करण्याबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये जाण्यासाठी आणि स्वतःहून अंतराळ उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. मिशनचा उत्साह सतत वाढत आहे आणि मला वाटते की, आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे सर्व काही खरे होत आहे.

कोण आहेत शुभांशु शुक्ला ?
शुभांशु शुक्ला (Shubanshu Shukla ) हे भारतीय हवाई दलात एक सन्मानित वैमानिक आहेत. ते अंतराळवीर म्हणून निवडले जाणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी, गगनयानसाठी चार वैमानिकांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झाला. शुक्ला यांना जून २००६ मध्ये भारतीय हवाई दलात (IAF) लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले. मार्च २०२४ मध्ये तो ग्रुप कॅप्टन बनला. त्यांना Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier आणि An-32 यासारख्या विविध लढाऊ विमानांवर काम करण्याचा अनुभव आहे.

शुभांशू शुक्लाच्या निवडीबद्दल त्यांच्या पालकांची प्रतिक्रिया काय?
भारत-अमेरिका मोहिमेसाठी त्यांच्या निवडीबद्दल वडील, निवृत्त सरकारी अधिकारी शंभू दयाळ शुक्ला म्हणाले की, कुटुंब या मोहिमेबद्दल घाबरलेले नाही, परंतु त्याच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. त्याची आई आशा शुक्ला यांनी त्यांचा मुलगा शुभांशू हा “थंड डोक्याचा माणूस” असल्याचे वर्णन केले, जो आपला राग न गमावता प्रत्येक परिस्थिती हाताळतो. (Shubanshu Shukla )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.