गुप्तचर यंत्रणेने रविवारी मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ येथे धाड टाकून, 6 जिहादी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी जुन्या भोपाळ शहरातील फातिमा मशिदीजवळच्या इमारतीत वास्तव्याला होते. विशेष म्हणजे ऐशबाग पोलिस ठाण्यापासून 200 मीटर अंतरावर केलेल्या या कारवाईची स्थानिक पोलिसांना तसूभरही कल्पना देण्यात आली नव्हती.
शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त
या संदर्भात स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 3 वाजता पोलिसांनी हे दहशतवादी राहत असलेल्या इमारतीत धाड टाकली. त्यानंतर या दहशतवाद्यांना अटक करून ते राहत असलेली खोली पूर्णपणे सील करण्यात आली. त्यांच्याकडून गुप्तचर यंत्रणांनी धार्मिक साहित्य, डझनहून अधिक लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि शस्त्रेही जप्त केली आहेत.
(हेही वाचाः ‘या’ देशाने एकाच दिवशी दिली 81 जणांना फाशी! काय आहे कारण?)
याआधीही दहशतवाद्यांना अटक
संशयित दहशतवादी भोपाळमध्ये लपल्याची गुप्त माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर तपास करून एजन्सी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना अटक केली. त्यांच्या सांगण्यावरून भोपाळच्या बाहेरील करौंड भागातील एका घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर आणि उज्जैनजवळील महिदपूर आणि उनहेल भागातूनही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही करावाई करण्यात आली असून, दहशतवादी कारवाया उधळून लावण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community