India-Pakistan सीमेवरून शस्त्रास्त्रांची तस्करी ; बीएसएफचे जवान आणि पंजाब पोलिसांची कारवाई

India-Pakistan सीमेवरून शस्त्रास्त्रांची तस्करी ; बीएसएफचे जवान आणि पंजाब पोलिसांची कारवाई

30
India-Pakistan सीमेवरून शस्त्रास्त्रांची तस्करी ; बीएसएफचे जवान आणि पंजाब पोलिसांची कारवाई
India-Pakistan सीमेवरून शस्त्रास्त्रांची तस्करी ; बीएसएफचे जवान आणि पंजाब पोलिसांची कारवाई

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) (BSF) जवानांनी आणि पंजाब पोलिसांनी पंजाबमधील भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सीमेवर केलेल्या दहा संयुक्त कारवाईत शस्त्रास्त्रे (weapons) आणि हेरॉइनच्या खेपेसमवेत दोन तस्करांना अटक केली आहे. जप्त केलेले खेप आणि शस्त्रे पाकिस्तानी तस्करांनी ड्रोनद्वारे भारतात पाठवली होती. गेल्या काही दिवसांपासून शस्त्रास्त्रांची तस्करी ही सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. (India-Pakistan)

हेही वाचा-Donald Trump : ‘या’ ४१ देशाच्या लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी ; काय आहे ‘ट्रॅव्हल बॅन’ ?

पहिली कारवाई फाजिल्का जिल्ह्यात करण्यात आली, जिथे बीएसएफ टीमने स्थानिक एसएसओसी फाजिल्काच्या सहकार्याने एका संशयास्पद घराची झडती घेतली. यावेळी दोन तस्करांना अटक करण्यात आली. त्यांची ओळख कुलदीप सिंग आणि राघव कुमार अशी झाली आहे. तस्करांकडून दोन पिस्तूल, २३ गोळ्यांनी भरलेले ९ मिमीचे काडतूस, दोन मॅगझिन आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. (India-Pakistan)

हेही वाचा-Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट

ही कारवाई अबोहर जिल्ह्यातील एका फार्महाऊसवरून करण्यात आली, जिथे तस्करांनी हे साहित्य लपवले होते. अटक केलेल्या तस्करांना त्यांच्या नेटवर्कची ओळख पटविण्यासाठी आणि तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आता या तस्करांची चौकशी करत आहेत आणि त्यांचे संबंध शोधत आहेत. (India-Pakistan)

हेही वाचा-मालवणमध्ये आमदार Nilesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शक्तिप्रदर्शन

दुसरी कारवाई गुरुदासपूर जिल्ह्यातील गहलेरी गावात करण्यात आली. येथे बीएसएफने पंजाब पोलिसांच्या सहकार्याने एका काळ्या पिशवीतून हेरॉइनचे दोन पॅकेट जप्त केले. हेरॉइनचे वजन १.०७ किलो होते. याशिवाय बॅगेत दोन .30 बोर पिस्तूल, .30 बोर काडतूसच्या 46 गोळ्या, 20 9 मिमी गोळ्या आणि चार मॅगझिन देखील सापडल्या. ही खेप पाकिस्तानी तस्करांनी ड्रोनद्वारे टाकली. यादरम्यान, एक बॅगही सापडली ज्यावर माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा फोटो छापलेला होता. (India-Pakistan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.