दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागांची बंपर भरती, ६९ हजारांपर्यंत मिळेल पगार

159

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 24,369 रिक्त जागा आहेत. या अंतर्गत सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण १० हजार ४९७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

( हेही वाचा : दहशतवादी संघटनांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालण्याची गरज – परराष्ट्र मंत्री जयशंकर )

अटी व नियम

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD)
  • पदसंख्या – २४ हजार ३६९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – १० वी पास
  • वयोमर्यादा – १८ ते २३ वर्ष
  • अर्ज शुल्क – १०० रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू करण्याची तारीख – २७ ऑक्टोबर २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२
  • संगणक आधारित परीक्षेची तारीख – जानेवारी २०२३
  • अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in

एकूण पदे – २४ हजार ३६९

  1. सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ) – १० हजार ४९७ पदे
  2. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – १०० पदे
  3. केंद्रीय राखीव पोलीस दल – ८ हजार ९११ पदे
  4. सशस्त्र सीमा बल – १ हजार २८४ पदे
  5. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस – १ हजार ६१३
  6. आसाम रायफल्स – १ हजार ६९७
  7. सचिवालय सुरक्षा दल – १०३ पदे
  8. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो – १६४ पदे

महत्त्वाचे नियम 

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेगवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.
  • परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि जागरुकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी/हिंदी या विषयातील ८० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि एकूण १६० गुण असतील.
  • परीक्षेसाठी एकूण ६० मिनिटांचा म्हणजेच एक तासाचा कालावधी दिला जाईल.
  • ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असेल.

SSC GD Constable पगार

पे लेवल १ – १८ हजार ते ५६ हजार ९००
पे लेवल ३ – २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये

New Project 2 17

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.