पृथ्वी-2 या अणवस्त्रवाहक क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री 10 जानेवारी रोजी यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील चांदिपूर तळावरील मोबाइल लाँचरवरुन या क्षेपणास्त्राने उड्डाण केले आणि अचूक लक्ष्यभेद केला. पृथ्वी -2 ची मारक क्षमता 350 किलोमीटर आहे.
( हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यास विलंब! शासनाकडे ९५० कोटी रुपयांची मागणी)
ओडीशामधील चांदीपूर येथील भारताच्या स्ट्रॅटीजिक फोर्स कमांडने इंटिग्रेटेड स्टेट रेंजवरुन पृथ्वी-2चे यशस्वी परिक्षण केले आहे. पृथ्वी -2 ची मारक क्षमता आणि अचूकता लक्षात येण्यासाठी ही टेस्टींग रात्री केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. नवीन भरती झालेल्या अधिकाऱ्यांना मिसाईल लॉचिंगचे ट्रेनिंग देण्यासाठी हे लाँचिग करण्यात आले. हे सिंगल स्टेज लिक्विड इंधन मिसाईल आहे. पृथ्वी मिसाईलवर 500 ते 1000 किलोग्रॅमची परमाणु हत्यारे लावण्याची व्यवस्था केली आहे. महत्वाचे म्हणजे, शत्रूच्या ऍटी-बॅलेस्टिक मिसाईलच्या तंत्रज्ञानाला धोका देण्यात सक्षम आहे. 2019 पासून हे चौथे युजर नाइट ट्रायल होते. आनंदाची बाब म्हणजे प्रत्येकवेळी पृथ्वी -2 चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.
पृथ्वी-2 हे भारतातील आकाराने लहान आणि वजनाने हलके असणारे मिसाईल आहे. याचे वजन 4600 किलोमीटर असून 110 सेंटीमीटर व्यास असून 8.56 मीटर लांबी आहे. पृथ्वी-2 मिसाइल मध्ये हाय एक्सप्लोसिव, पेनेट्रेशन, क्लस्टर म्यूनिशन, फ्रॅगमेंटेशन, थर्मोबेरिक, केमिकल वेपन आणि टैक्टिकल न्यूक्लियर वेपन लाऊ शकतो. पृथ्वी-2 मिसाइल स्ट्रैप-डाउन इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टिमवर काम करते. पृथ्वी-2चे खरे नाव एसएस-250 असून, भारतीय वायुसेनेसाठी बनवण्यात आले आहे.