पुण्यात सुखोई विमानाचा टायर फुटला

111

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी, ३० मार्च रोजी सुखोई लढाऊ विमानाचा पुणे विमानतळावर मोठा अपघात झाला असता पण सुदैवाने हा अपघात टळला. विमानतळावर सुखोई विमान लँडिंग करताना सुखोई लढाऊ विमानाचा टायर फुटला. त्यामुळे येथील धावपट्टी काही काळासाठी बंद झाली होती. या अपघातामुळे विमानतळाची धावपट्टी दोन तास बंद झाली होती. त्यामुळे या विमानतळावरून अनेक उड्डाणे मुंबई आणि इतर ठिकाणी वळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला, असे स्थानिक माध्यमांचे म्हणणे होते. विमानतळ बंद पडल्याने विमानांची उड्डाणे होऊ शकली नाही.

मोठी दुर्घटना टळली 

या अपघातानंतर भारतीय हवाई दलाच्या कर्मचार्‍यांनी धावपट्टी साफ केली आणि आवश्यक तपासणीनंतर विमानतळ उड्डाणांसाठी पुन्हा सुरु केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत धावपट्टी बंद राहिल्याने विमानांच्या ये-जा करणाऱ्यांवर परिणाम झाला. पुण्यातील लोहगाव विमानतळावर ही मोठी दुर्घटना टळली. प्रसंगावधान राखत तातडीने धावपट्टी मोकळी करुन हवाई वाहतूक सुरळीत करण्यात आली. हवाईदलाने ही माहिती दिली आहे. नागरी विमान उड्डाणांमध्ये विलंब होऊ नये यासाठी धावपट्टी विक्रमी वेळेत सुरू करण्यात आल्याचे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा १ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.