Sumedha Warship At Kenya : भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल

Indian Navyच्या कोणत्याही जहाजाने केनिया दिलेली ही पहिलीच भेट

215
Sumedha Warship At Kenya : भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल
Sumedha Warship At Kenya : भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल

आफ्रिकेत केल्या जात असलेल्या लांब पल्ल्याच्या तैनातीचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाचे (Indian Navy) जहाज ‘सुमेधा’ 09 डिसेंबर 2023 रोजी केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल झाले. (Sumedha Warship At Kenya) केनियातील अलीकडे विकसित करण्यात आलेल्या बंदरावर भारतीय नौदलाच्या कोणत्याही जहाजाने दिलेली ही पहिलीच भेट आहे.

(हेही वाचा – Sharmila Thackeray On Deepfake : ‘डीपफेक’वर शर्मिला ठाकरेही नाराज; म्हणाल्या, माझ्या मुलीलाही…)

या बंदर भेटी दरम्यान, दोन्ही नौदलांचे कर्मचारी परस्पर सहकार्य वाढवण्याच्या आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक संवाद, डेक भेटी आणि क्रीडा स्पर्धांद्वारे देवाणघेवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या भेटीचा भाग म्हणून एक संयुक्त योग सत्र, डेकवरील मेजवानी (deckerville hosting), वैद्यकीय शिबिर आणि सागरी भागीदारी व्यायामाचे नियोजन देखील आयोजित करण्यात आले आहे.

आयएनएस सुमेधा (INS Sumedha) ही भारतीय नौदलाच्या स्वदेशात विकसित सरयू (Saryu) श्रेणीतील तिसरे जहाज आहे. 7 मार्च 2014 रोजी राष्ट्रार्पण झालेल्या या जहाजाला स्वतंत्रपणे आणि सामुहिक कार्यांच्या समर्थनार्थ विविध भूमिकांमध्ये तैनात करण्यात आले आहे. हे जहाज शस्त्रे आणि सेन्सर्सच्या रचनेने सुसज्ज आहे, तसेच हे जहाज अनेक भूमिका निभावणारे हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. हे जहाज विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे स्थित भारतीय नौदलाच्या (Indian Navy) पूर्व फ्लीटचा एक भाग आहे आणि पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत कार्य करते. (Sumedha Warship At Kenya)

(हेही वाचा – Half Marathon: भारतीय सैन्याकडून माजी सैनिकांना अर्ध मॅरेथॉन ‘अॉनर रन’ द्वारे मानवंदना)

भारतीय नौदलाच्या ‘मैत्रीचे पूल’ बांधण्याच्या आणि मैत्रीपूर्ण देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाची जहाजे नियमितपणे परदेशात तैनात केली जातात. ही भेट ‘क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ (SAGAR) या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे आणि भारत-आफ्रिकेतील संबंध (Indo-African Relations) आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.