जूनपासून अंतराळात अडकलेल्या Sunita Williams २०२५ मध्ये परतणार

197
जूनपासून अंतराळात अडकलेल्या Sunita Williams २०२५ मध्ये परतणार
जूनपासून अंतराळात अडकलेल्या Sunita Williams २०२५ मध्ये परतणार

बोइंगचे स्टारलाइयनर यान 5 जून रोजी सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बूच विल्मोर (Butch Wilmore) यांना घेऊन अंतराळात गेले होते. त्यानंतर एक आठवडा तिथे थांबून त्यांना पुन्हा पृथ्वीवर परतायचे होते. जूनमध्ये त्यांनी परत येणे अपेक्षित होते. मात्र, थ्रस्टर आणि हिलियम लीक झाल्यामुळं ते तिथेच अडकून पडले आहेत. नासाकडून त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी नासा (NASA) स्पेसएक्सची मदत घेणार आहे.

नासा एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीसोबत काम करतेय
कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासाचा मुख्य पर्याय हा बुच आणि सुनीता यांना स्टारलायनर यानातून पृथ्वीवर परत आणण्याचा आहे. तसंच, त्याचबरोबर अन्य काही पर्याय आहेत का याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. नासा एलन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्स (SpaceX) या कंपनीसोबत काम करत आहेत. आम्ही स्पेसएक्ससोबत मिळून हे निश्चित करत आहोत की क्रू 9 व्यवस्थितरित्या काम करत आहे का? कारण आम्हाला गरज पडल्यास बुच आणि सुनीता विलियम्स यांना क्रु 9तून पुन्हा पृथ्वीवर आणण्यात येईल, असं स्टिच यांनी म्हटलं आहे. (Sunita Williams)

फेब्रुवारी 2025मध्ये परतणार
क्रु 9च्या लाँचिगबद्दल बोलतानाच अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी स्टारलाइनरमध्ये फसलेल्या दोन आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येण्याची योजना बनवली आहे. 2025पर्यंत सुनिता आणि विल्यम यांना पृथ्वीवर परत घेऊन येणे हे आमचं उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, आम्ही क्रू 9साठी ड्रॅगनची स्थापना केली आहे. जेणेकरुन त्यात लवचिकता असेल. यावेळी फक्त दोन आंतराळवीरच अंतराळात भरारी घेतील. जेणेकरुन फेब्रुवारी 2025मध्ये चार क्रू सदस्यांना पृथ्वीवर परत आणता येईल. हे दोन आंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स असतील. (Sunita Williams)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.