सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून (Starliner Spacecraft) ISS वर गेले होते. त्यांचा हा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास लांबला. यासाठी इलॉन मस्क यांनी नासाच्या मदतीसाठी धाव घेतली होती. मात्र आता इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या Crew-10 Mission च्या Falcon 9 रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. (Sunita Williams)
Our #Crew10 explorers are launching to the @Space_Station this evening. Come watch with us!
Crew-10 is scheduled to lift off atop a @SpaceX Falcon 9 rocket at 7:48pm ET (2348 UTC). Share your questions with #AskNASA and we’ll answer a few on stream! https://t.co/o3onJBNTe9
— NASA (@NASA) March 12, 2025
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांच्यावर सोपवली होती. ट्रम्प यांनी सुनिता विल्यम्सच्या परत येण्याच्या विलंबसाठी जो बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले होते. (Sunita Williams)
हेही वाचा-Shubman Gill : शुभमन गिल ठरला फेब्रुवारीतील आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासा व स्पेसएक्सतर्फे १३ मार्च २०२५ रोजी मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेची सर्व तयारीही झाली होती. आता NASA SpaceX Crew-10 Mission च्या Falcon 9 रॉकेटचं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना परत आणण्याच्या मोहिमेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. फाल्कन रॉकेट लाँचसाठी आवश्यक असणारं हवामान नसल्यामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. रॉकेटच्या मार्गात पाऊस आणि वेगवान वारे असण्याचा अंदाज आहे. (Sunita Williams)
हेही वाचा-12th Answer Sheets : १२ वीच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळाल्या; निकालावर काय होईल परिणाम ?
हे प्रक्षेपण आता १४ किंवा १५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी केलं जाणार आहे. नासाच्या रॉकेट लाँच कॅम्पस ३९ए या ठिकाणाहून हे प्रक्षेपण होईल. जर सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्या गेल्या, तर स्पेसएक्सच्या मदतीने सुनीता आणि विलमोर यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणता येईल. (Sunita Williams)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community