Swarm Drones : एका क्षणात भारतीय लष्कर शत्रूचे तळ करणार उद्ध्वस्त

भारतीय सैन्याला बळकटी देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी २८ हजार ७३२ कोटींची यंत्र आणि हत्यारे खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट आणि कार्बाइन्सचा समावेश आहे. डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिल (डीएसी) ने भारतीय श्रेणीतील (इंडियन आयडीडीएम) संरक्षण खरेदीला मान्यता दिली आहे, ज्यामुळे संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना मिळेल.

( हेही वाचा : महाबळेश्वरमधील पॉइंट्सची नावे बदलणार? )

स्वार्म ड्रोन्सची क्षमता

स्वार्म ड्रोन्सद्वारे एकाचवेळी शेडको छोट्या छोट्या ड्रोन्सना हत्यारे किंवा कॅमेरे लावून शत्रूच्या भागात हेरगिरी करता येते. स्वार्म ड्रोन्स रिमोट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत उडवता येते. या ड्रोन्सवर गाइडेड, अनगाइडेड, क्लस्टर, लेझर गाईडेड, छोटी क्षेपणास्त्रे यावर हल्ला करता येऊ शकतो. स्वार्म ड्रोन्सची रेंज लष्कर आपल्या सोयीनुसार निश्चित करू शकते. सध्या सर्वात लांब पल्ल्याच्या ड्रोनची मारक क्षमता ही ५० किमी एवढी आहे. स्वार्म ड्रोन्स कंट्रोल युनिटच्या माध्यमातून नियंत्रित करता येतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here