सीरियातील राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांचे सरकार पडल्यानंतर भारताने तिथून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बंडखोर गटांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी माहिती देताना सांगितले की, “आम्ही सीरियामध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे, तसेच आतापर्यंत ७७ भारतीयांना सीरियातून बाहेर काढण्यात आले आहे.” (Syria Update)
(हेही वाचा- Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; रेल्वे १५ ते २० मिनिटे उशीराने)
प्रवक्त्याने सांगितले की भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सीरियाच्या सीमेवर पोहोचवले, त्यानंतर लेबनॉनमधील भारतीय मिशनने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना इमिग्रेशनमध्ये मदत केली. जयस्वाल म्हणाले. “आम्ही लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना भारतात परत पाठवण्याची सर्व व्यवस्थाही केली. बहुतांश नागरिक भारतात परतले आहेत. (Syria Update)
यात्रेकरूंचीही व्यवस्था
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, सीरियामध्ये यात्रेसाठी गेलेल्या ४४ यात्रेकरू गुरुवारी बेरूतहून निघाले आहेत. दमास्कसमधील भारतीय दूतावास अजूनही सक्रिय असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही जयस्वाल म्हणाले. सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता भारताने शांतता आणि सर्वसमावेशक राजकारणाचे आवाहन केले आहे. (Syria Update)
(हेही वाचा- Megablock News : रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक वाचा; पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक)
“आम्ही सीरियातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व पक्षांना सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (Syria Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community