
तहव्वूर राणावर (Tahawwur Rana) भारतात १० गंभीर खटले दाखल करण्यात आले असून यात हत्या, हत्येचा कट, दहशतवादी कारवायांमधील सहभाग, फसवणुकीसह इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. भारताने तहव्वूर राणाविरोधात केलेल्या आरोपांमुसार त्याने त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमॅन हेडली याला हल्ल्याची योजना बनवण्यासाठी, हल्ल्याची ठिकाणं निश्चित करण्यासाठी, त्या ठिकाणांची रेकी करण्यासाठी मदत केली होती. त्यासाठी त्याने मुंबईत इमिग्रेशन व्यवसायाची नकली शाखा उघडली होती. हेडलीला त्या शाखेचा संचालक म्हणून नेमलं होतं. दोन वेळा बनावट दस्तावेजांसह व्हिसासाठी अर्ज दाखल केले होते. (Tahawwur Rana)
दरम्यान, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाची चौकशी करत असताना अनेक गुपितं उघड झाली आहेत. ज्यामुळे तहव्वूरची भूमिका व त्याचे हेतू स्पष्ट झाले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तो डेव्हिड हेडलीला म्हणाला होता की “भारतीयांना अशीच अद्दल घडायला हवी होती. भारतीय त्याच लायकीचे आहेत”. तहव्वूर राणा एवढ्यावरच थांबला नाही. २६/११ च्या हल्ल्यात भारतीय नागरिक, पोलीस व सैनिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान निशान-ए-हैदर देऊन त्यांचा गौरव करण्याची मागणी देखील त्याने केली होती. (Tahawwur Rana)
हेही वाचा- Jammu and Kashmir च्या किश्तवाडमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; चकमकीत लष्कराचे JCO हुतात्मा
ही माहिती अमेरिकेच्या न्याय खात्याने दिली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सहा अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. हा हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब यालाच जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात अन्य नऊ दहशतवादी मारले गेले. अमेरिकी न्याय विभागाने म्हटले आहे की, मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना न्याय मिळावा या दृष्टीनेच राणाचे भारतात प्रत्यर्पण करण्यात आले. (Tahawwur Rana)
तहव्वूर राणा व डेव्हिड कोलमन हेडली यांच्या संभाषणावर अमेरिकी गुप्तचर संस्थांनी पाळत ठेवली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राणाने हेडलीला सांगितले की, हेडलीने पाकिस्तानात लष्कर-ए-तोय्यबाच्या दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबईवरील हल्ल्याचा कट आखला. हेडलीने भारतीय अधिकाऱ्यांकडे व्हिसासाठी दोन वेळा अर्ज केला. त्यामध्ये दिलेली खोटी माहिती राणाने त्याला पुरविली. (Tahawwur Rana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community